जनावरांचे दोन टन मांस जप्त
By admin | Published: April 20, 2015 01:41 AM2015-04-20T01:41:07+5:302015-04-20T13:13:12+5:30
अहमदनगर : संगमनेर येथून नगर येथे विक्रीसाठी येत असलेल्या जनावरांचे मांस टेम्पोसह एमआयडीसी पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर : संगमनेर येथून नगर येथे विक्रीसाठी येत असलेल्या जनावरांचे मांस टेम्पोसह एमआयडीसी पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजेंद्र माळी आणि शहाजी धुमाळ हे गस्तीवर असताना त्यांना एमआयडीसी भागात मनमाड रोडवरील एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या टेम्पोतून रक्त गळत असल्याचे दिसले. यावेळी त्यांनी टेम्पोला (एम.एच. १७, डी-२९४२) थांबण्याचा इशारा केला, मात्र टेम्पो चालकाने पळ काढला. माळी व धुमाळ यांनी टेम्पोचा पाठलाग केला आणि पकडले. टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये जनावरांचे दोन टन मांस आढळून आले. हे मांस जनावरांचे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मांसासह टेम्पो जप्त केला. मांसाची वाहतूक करणारे गणेश बबन मिसाळ, अजय शामराव जाधव, कबीर इलियास कुरेशी (सर्व रा. संगमनेर) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मांस आणि टेम्पोसह चार लाखांचा माल असल्याचे पोलिस म्हणाले. प्राणी संरक्षण कायद्यानुसार हा गुन्हा दाखल केला आहे.