एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोरासमोर आल्या; नागरिकांची उडाली ताळंबळ, रुळावर उतरुन पळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 19:46 IST2022-12-31T19:35:46+5:302022-12-31T19:46:04+5:30
उत्तर प्रदेशातील बहराइचमधील रिसिया रेल्वे स्थानकावर मोठा अपघात टळला.

एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोरासमोर आल्या; नागरिकांची उडाली ताळंबळ, रुळावर उतरुन पळाले
उत्तर प्रदेशातील बहराइचमधील रिसिया रेल्वे स्थानकावर मोठा अपघात टळला. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे स्थानकावर उभी असलेल्या रेल्वेच्या रुळावर समोरून दुसरी गाडी आली. मात्र, लोको पायलटच्या सावधानीमुळे समोर उभ्या असलेल्या ट्रेनच्या ३०० मीटरच्या अतंरावर ती ट्रेन थांबली. स्टेशन अधीक्षकांनी ही तांत्रिक चूक असल्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे, बहराइच मैलानी पॅसेंजर ट्रेन आधीच रिसिया रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभी होती, तर बहराइच नेपाळगंज पॅसेंजर ट्रेन क्रॉसिंगसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर जाणार होती. त्यानंतर पॉइंट मॅनने पॉइंट नंबर तीन ते पॉइंट नंबर एकला मुख्य पॉइंट जोडला, पण तांत्रिक बिघाडामुळे ते होऊ शकले नाही. त्यामुळे दुसरी गाडी रेल्वे स्थानकाजवळ आल्यावर प्लॅटफॉर्म क्रमांक एक ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर गेली.
लोको पायलटने समजूतदारपणा दाखवत ट्रेन थांबवली आणि मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली. त्याचवेळी त्याच रुळावरून ट्रेन जात असल्याचे पाहून ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि लोक ट्रेनमधून उतरून रेल्वे रुळाच्या बाजूला पळू लागले.
...यामुळे दोन गाड्या एकाच रुळावर आल्या
या प्रकरणी रिसिया रेल्वे स्टेशनचे अधीक्षक हरीश कुमार शर्मा यांनी सांगितले की, पॉइंट मॅनने पॉइंट तीनवरून पॉइंट एकला मुख्य पॉइंट काढला होता, पण पॉइंटचा पेलेंजर पॉइंट नंबर तीनमधून काढला नाही. यामुळे ट्रेन त्याच प्लॅटफॉर्म तीनवर गेली, ज्यावर ट्रेन आधीच उभी होती.