पेणमध्ये दोन पाटील आमनेसामने

By admin | Published: September 26, 2014 11:22 PM2014-09-26T23:22:51+5:302014-09-26T23:22:51+5:30

पेण विधानसभा निवडणुकीकरिता एकूण ३३ अर्ज राजकीय पक्ष, अपक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांकडून नेण्यात आल्याचे निवडणूक सूत्रांनी सांगितले

With two tricks in the pen | पेणमध्ये दोन पाटील आमनेसामने

पेणमध्ये दोन पाटील आमनेसामने

Next

पेण : पेण, पाली, नागोठणे, रोहा विधानसभा मतदारसंघातील पेणमधील शेकाप आमदार धैर्यशील पाटील व अ. भा. काँग्रेस पक्षाचे रविशेठ पाटील या दोन पाटलांनी आज पेणच्या प्रांताधिकारी निधी चौधरी यांच्याकडे विधानसभा उमेदवारी अर्ज सादर केले.
पेण विधानसभा निवडणुकीकरिता एकूण ३३ अर्ज राजकीय पक्ष, अपक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांकडून नेण्यात आल्याचे निवडणूक सूत्रांनी सांगितले. मात्र आज शेकापचे विद्यमान आमदार धैर्यशील पाटील व त्यांच्या अर्धांगिनीने अ‍ॅड. निलीमा पाटील यांनीही शेकापतर्फे अत्यंत साधेपणाने अर्ज भरला. साधेपणाने अर्ज सादर करण्यामागे त्यांचे दिवंगत वडील माजी मंत्री भाईसाहेब पाटील यांची भासलेली उणीव व आठवणीने धैर्यशील पाटील यांनी बडेजाव, ढोलताशे, बँजो या मिरवणुकीतील साधनाचा कोठेही वापर नव्हता. पार्टी आॅफिस जवळून ते थेट चालत प्रांत आॅफिसमध्ये दाखल झाले.
दुसरीकडे मात्र काँग्रेस पक्षाने शक्तीप्रदर्शन करीत रविशेठ पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी त्यांचे निवासस्थान असलेल्या वैकुंट निवासपासून पेण शहरात रॅली काढून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्यासोबत पालीचे प्रकाश देसाई, मारुती देवरे, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, नागोठण्याचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते, पेण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक मोकल, जि.प. सदस्य कौशल्या पाटील यांच्यासह काँगे्रस कमिट्यांचे पदाधिकारी शेकाप काँग्रेस या कट्टर राजकीय विरोधक असलेल्या दोन पाटलांबरोबर हिंदूस्थान पार्टीचे संदीप पार्टे यांनीही उमेदवारी अर्ज भरला.(वार्ताहर)

Web Title: With two tricks in the pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.