वॉशिंग मशिनमध्ये बुडून दोन जुळ्या मुलांचा मृत्यू

By admin | Published: February 27, 2017 04:31 AM2017-02-27T04:31:45+5:302017-02-27T04:31:45+5:30

शनिवारी दुपारी तीन वर्षे वयाच्या दोन जुळ्या मुलांचा वॉशिंग मशिनमध्ये बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Two twin boys die after drowning in a washing machine | वॉशिंग मशिनमध्ये बुडून दोन जुळ्या मुलांचा मृत्यू

वॉशिंग मशिनमध्ये बुडून दोन जुळ्या मुलांचा मृत्यू

Next


नवी दिल्ली : दिल्लीच्या रोहिणी भागात अवंतिका हाउसिंग कॉम्प्लेक्समधील एका घरात शनिवारी दुपारी तीन वर्षे वयाच्या दोन जुळ्या मुलांचा वॉशिंग मशिनमध्ये बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मृत्यू झालेल्या या जुळ्या मुलांची नावे लक्ष्य आणि नीशू अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासावरून हे मृत्यू बुडून झाले व हा अपघात होता, असे दिसत असले तरी या घटनेचा अन्य पैलूंच्या दृष्टीनेही तपास करण्यात येत आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी इस्पितळात पाठविण्यात आले. सुरुवातीस पोलिसांना ही जुळी मुले हरविल्याचा फोन आला. मात्र नंतर त्यांच्या आई-वडिलांनी मुले वॉशिंग मशिनमध्ये बुडून मृत्युमुखी पडल्याचे कळविले.
या कॉम्प्लेक्समध्ये रवींंदर आणि राखी हे दाम्पत्य पहिल्या मजल्यावर राहते. रवींदर एका खासगी विमा कंपनीत मॅनेजर आहे व त्या वेळी तो कामावर गेलेला होता. या दाम्पत्याचा मोठा मुलगा आदित्य शाळेत गेला होता. या दाम्पत्याकडे सेमी आॅटोमॅटिक वॉशिंग मशिन आहे. राखीने बाथरूमजवळच्या पॅसेजमध्ये मशिन लावले व धुवायच्या कपड्यांचा ढीग बाजूला ठेवला. त्या वेळी लक्ष्य व नीशू घरातच बाजूला खेळत होते. (वृत्तसंस्था)
>अपघाताविषयी शंकेला जागा
आई घराबाहेर गेल्यावर ही जुळी मुले कपड्यांच्या ढिगावर चढली असावीत आणि मशिनमध्ये डोकावून पाहताना तोल जाऊन ती आत पडली असावीत, असा तर्क आहे. परंतु सेमी आॅटोमॅटिक मशिनच्या वॉशिंग ड्रममध्ये जेमतेम तीन-चार बादल्या पाणी मावते. शिवाय ड्रमच्या मधोमध कपडे घुसळणारा दांडा असतो. अशा अवस्थेत ही दोन्ही मुले गुदमरून मृत्यू येण्याएवढी आणि तीही एकाच वेळी पाण्यात कशी बुडाली, ही शंकेची जागा शिल्लक राहते.

Web Title: Two twin boys die after drowning in a washing machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.