आता विमानतळ, विमानात नो क्लिक क्लिक; डीजीसीएकडून आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 04:14 PM2020-09-12T16:14:59+5:302020-09-12T16:15:39+5:30

सुरक्षेसाठी नियमांत बदल; डीजीसीएकडून आदेश जारी

two week flight suspension if airlines fail to stop photography on board and aerodrome | आता विमानतळ, विमानात नो क्लिक क्लिक; डीजीसीएकडून आदेश जारी

आता विमानतळ, विमानात नो क्लिक क्लिक; डीजीसीएकडून आदेश जारी

Next

नवी दिल्ली: डीजीसीएनं हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार प्रवाशांना सरकारी विमानतळं आणि विमानात फोटो काढता येणार नाहीत. काही विशेष प्रकरणांमध्ये परवानगी घेऊन फोटो काढण्याची मुभा मिळू शकेल. त्यासाठी डीजी, जॉईंट डीजी, डेप्युटी डीजी यांची लिखित परवानगी आवश्यक असेल.

डीजीसीएनं याबद्दल एक आदेश प्रसिद्ध केला आहे. 'एअरक्राफ्ट नियम १९३७ च्या नियम क्रमांक १३ नुसार कोणत्याही व्यक्तीला विमानतळ किंवा विमानात फोटो काढण्याची परवानगी नाही. केवळ डीजी, जॉईंट डीजी, डेप्युटी डीजी यांची लिखित परवानगी असल्यावरच एखाद्या व्यक्तीला फोटो काढण्याची मुभा मिळू शकते, याची तुम्हाला कल्पना आहे,' असं डीजीसीएनं आदेशात म्हटलं आहे.



विमान लँडिंग, टेक ऑफ करत असताना लिखित परवानगी लागू नसेल, असंही डीजीसीएनं स्पष्ट केलं आहे. सुरक्षेचे सर्वोच्च मापदंड राखले जावेत यासाठी हा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

नियमांचं पालन न झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा डीजीसीएनं दिला आहे. 'प्रवासी विमानात नियमांचं उल्लंघन झाल्यास विमानाच्या त्या मार्गावरील फेऱ्या पुढील दिवसापासून दोन आठवड्यांपर्यंत रद्द करण्यात येतील. संबंधित विमान कंपनीनं नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर योग्य कारवाई केल्यानंतरच तिला सेवा पूर्ववत करण्याची परवानगी देण्यात येईल,' असं डीजीसीएनं आदेशात म्हटलं आहे.

Web Title: two week flight suspension if airlines fail to stop photography on board and aerodrome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.