कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:07 AM2019-01-07T00:07:51+5:302019-01-07T00:08:34+5:30

येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दुर्गवरुन देवरी मार्गे परसवाडाकडे जाणाऱ्या एका भरधाव टोयाटा इरिओस कारने दुचाकीस्वारास धडक दिली. या दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि.६) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास येथील मॉ धुकेश्वरी मंदिराजवळ घडली.

Two wheelers injured in a car crash | कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दुर्गवरुन देवरी मार्गे परसवाडाकडे जाणाऱ्या एका भरधाव टोयाटा इरिओस कारने दुचाकीस्वारास धडक दिली. या दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि.६) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास येथील मॉ धुकेश्वरी मंदिराजवळ घडली. विशाल गोपीचंद भेंडारकर (३५) रा.नवेगावबांध असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार विशाल भेंडारकर हे रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास येथील मॉ धुकेश्वरी मंदिरातून देवदर्शन करुन परत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ओलांडित असताना दुर्गकडून भरधाव वेगात येणाºया टोयाटा इरिओस कार क्रमांक सी.जी.०४ एल.एल. ७७५६ याने भेंडारकर यांच्या होंडा साईन क्रमांक एमएच ३५ ए.एफ. ९६८१ या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक ऐवढी जोरदार होती की या धडकेत दुचाकी घटनास्थळापासून १०० फूट अंतरावर फेकल्या गेली. जखमी शिक्षक हा कारच्या काचेवर आदळून खाली पडला. या घटनेत या शिक्षकाचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. या घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली असून पुढील तपास ठाणेदार कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title: Two wheelers injured in a car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.