काळ्या पैशाप्रकरणी सराफाला दोन वर्षाचा कारावास
By admin | Published: April 18, 2017 03:16 PM2017-04-18T15:16:59+5:302017-04-18T15:35:19+5:30
स्वीस बॅंकेत अघोषित रक्कम ठेवल्याप्रकरणी येथील न्यायालयाने एका सराफाला दोन वर्षांची सश्रम कारावासची शिक्षा सुनावली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
देहराडून, दि. 18 - स्वीस बॅंकेत अघोषित रक्कम ठेवल्याप्रकरणी येथील न्यायालयाने एका सराफाला दोन वर्षांची सश्रम कारावासची शिक्षा सुनावली आहे.
केंद्र सरकारने देशातील काळ्यापैशांविरोधात मोहिम सुरु केली आहे. त्या मोहिमेत राजू वर्मा या सराफाला आयकर विभागाने अटक केली होती. त्याच्यावर कर बुडविल्याचा आरोप असून याप्रकरणाच्या सुनावणी दरम्यान देहराडून न्यायालयाने राजू वर्मा याला स्वीस बॅंकेत अघोषित रक्कम ठेवल्याप्रकरणी दोन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, आठ लाख रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला आहे. सराफ राजू वर्माने मुद्दामहून कर चुकवेगिरी केली. 1996 मध्ये स्वीस बॅंकमध्ये 92 लाख रुपये राजू वर्माने जमा केले होते. यावेळी आयकर रिटर्न भरले नव्हते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
2012 मध्ये आयकर विभागाने त्याच्या पंजाब ज्वेलर्सवर छापा मारला. त्यावेळी त्याला अटक केली. त्यानंतर 2015 मध्ये त्याच्याविरोधात जवळपास 16 गुन्हांची नोंद करण्यात आली होती.