VIDEO- बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा 109 तासांनी बाहेर काढल्यानंतर मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 09:17 AM2019-06-11T09:17:13+5:302019-06-11T09:32:00+5:30

बोअरवेलमध्ये पडलेला दोन वर्षीय मुलगा फतेहवीर सिंह याला तब्बल 109 तासांनी बाहेर काढण्यात यश आलं होतं.

two year old fatehveer singh rescued from borewell in sangrur after almost 109 hour | VIDEO- बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा 109 तासांनी बाहेर काढल्यानंतर मृत्यू 

VIDEO- बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा 109 तासांनी बाहेर काढल्यानंतर मृत्यू 

Next

संगरुरः बोअरवेलमध्ये पडलेला दोन वर्षीय मुलगा फतेहवीर सिंह याला तब्बल 109 तासांनी बाहेर काढण्यात यश आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याला जीव गमवावा लागला आहे. फतेहवीर नावाचा हा दोन वर्षांचा मुलगा गुरुवारी संध्याकाळी 150 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. पंजाबमधल्या भगवानपुरा गावात कोरड्याठाक पडलेल्या या बोअरवेलला कपड्यानं झाकून ठेवण्यात आलं होतं. फतेहवीर खेळता खेळता जाऊन त्या बोअरवेलमध्ये पडला.

सुरुवातीला त्याच्या आईनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या मातेचा प्रयत्न अयशस्वी ठरला. दोन वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची माहिती मिळताच त्याच्या मदतीसाठी बचाव पथक आले. बचाव पथक रविवारपर्यंत मुलाच्या जवळपास पोहोचलं होतं. परंतु त्याला बाहेर काढण्यात त्यांना सातत्यानं अपयश येत होतं.


कारण काही तांत्रिक अडचण आली होती. तो चिमुकला दोन दिवस अन्न-पाण्यावाचून होता. पण त्याला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. त्यानंतर बचाव पथकाच्या मदतकार्यात एनडीआरएफ, पोलीस, नागरी प्रशासन, ग्रामीण आणि स्थानिक सहभागी झाले.
उकाड्यानं हैराण होऊन सुद्धा त्या चिमुकल्याला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. मुलाला वाचवण्यासाठी त्या बोअरवेलला समांतर असणारी दुसरी बोअरवेलही खोदण्यात आली. त्यात 36 व्यासाचा पाईप टाकण्यात आला. या नव्या बोअरवेलच्या माध्यमातून आज सकाळी मुलाला बाहेर काढण्यात आलं. 

Web Title: two year old fatehveer singh rescued from borewell in sangrur after almost 109 hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.