पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीस दोन वर्षाची शिक्षा

By admin | Published: January 29, 2016 10:40 PM2016-01-29T22:40:00+5:302016-01-29T22:40:00+5:30

जळगाव: खुनाच्या गुन्‘ात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पोलिसाच्या तावडीतून पळालेल्या गोपाळ माधव गायकवाड या आरोपीस कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्ष कैदेची शिक्षा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली. गायकवाड हा रणजीत भोईटे खून खटल्यातील आरोपी आहे. त्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जळगाव न्यायालयात प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यासाठी त्याला १ ऑक्टोबर २००९ रोजी नाशिक येथून जळगावला आणले होते. दुसर्‍या दिवशी त्याची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तेथे किडनी स्टोनचे कारण सांगून त्याला ४ ऑक्टोबर २००९ रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यादिवशी बंदोबस्ताला असलेल्या अजीज तडवी या पोलीस कर्मचार्‍याला त्याने रात्री पावणे बारा वाजता शौचास लागल्याचे सांगून बाहेर नेले, तेव्हा त्याला गुंगारा देत त्याने पळ काढला होता. याबाबत ५ ऑक्टोबर रोजी जिल्हा पेठ पो

Two-year sentence for the accused who fled from the police custody | पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीस दोन वर्षाची शिक्षा

पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीस दोन वर्षाची शिक्षा

Next
गाव: खुनाच्या गुन्‘ात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पोलिसाच्या तावडीतून पळालेल्या गोपाळ माधव गायकवाड या आरोपीस कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्ष कैदेची शिक्षा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली. गायकवाड हा रणजीत भोईटे खून खटल्यातील आरोपी आहे. त्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जळगाव न्यायालयात प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यासाठी त्याला १ ऑक्टोबर २००९ रोजी नाशिक येथून जळगावला आणले होते. दुसर्‍या दिवशी त्याची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तेथे किडनी स्टोनचे कारण सांगून त्याला ४ ऑक्टोबर २००९ रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यादिवशी बंदोबस्ताला असलेल्या अजीज तडवी या पोलीस कर्मचार्‍याला त्याने रात्री पावणे बारा वाजता शौचास लागल्याचे सांगून बाहेर नेले, तेव्हा त्याला गुंगारा देत त्याने पळ काढला होता. याबाबत ५ ऑक्टोबर रोजी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१० मध्ये या खटल्याचे दोषारोप दाखल करण्यात आले होते. मूळ खटल्यात दहा साक्षीदार तपासण्यात आले. १४ सप्टेबर २०११ रोजी कनिष्ठ न्यायालयाने गायकवाड याला दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुध्द त्याने सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. शुक्रवारी न्या.ए.के.पटनी यांनी २२ जानेवारी रोजी ही शिक्षा कायम ठेवण्याचा निकाल देण्यासह पूर्वीच्या शिक्षेतून ही शिक्षा वगळू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी तर आरोपीतर्फे ॲड.विजय दर्जी यांनी काम पाहिले.

Web Title: Two-year sentence for the accused who fled from the police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.