दोन वर्षांचे ‘ते’ बी.एड. कायमचे बंद;  २०२४-२५ पासून आता ४ वर्षांचा कोर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 05:56 AM2024-01-08T05:56:22+5:302024-01-08T05:56:48+5:30

RCIने परिपत्रकातून दिली माहिती

Two years B.Ed. for teachers Closed forever as 4 years course now from 2024-25 | दोन वर्षांचे ‘ते’ बी.एड. कायमचे बंद;  २०२४-२५ पासून आता ४ वर्षांचा कोर्स

दोन वर्षांचे ‘ते’ बी.एड. कायमचे बंद;  २०२४-२५ पासून आता ४ वर्षांचा कोर्स

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दोन वर्षांचा बी.एड. (विशेष शिक्षण) अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. पुढील शैक्षणिक सत्र २०२४-२०२५ पासून केवळ चार वर्षांच्या बी.एड. अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाईल, असे रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या (आरसीआय) परिपत्रकात म्हटले आहे.

एनसीटीईने नवीन शैक्षणिक धोरण-२०२० (एनईपी)अंतर्गत एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमात (आयटीईपी) चार वर्षांच्या बी.एड.ची तरतूद केली आहे. त्यामुळे आरसीआयनेही तसा निर्णय घेतला आहे. येत्या सत्रापासून ४ वर्षांच्या अभ्यासक्रमालाच मान्यता मिळेल असे, आरसीआयचे सचिव विकास त्रिवेदी यांनी म्हटले आहे.  

नव्या अभ्यासक्रमात काय?

  • बी.एड.च्या विशेष शिक्षण अभ्यासक्रमात दिव्यांग मुलांना शिकविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. 
  • श्रवण, वाक्, दृष्टिदोष, मानसिक अपंगत्व असलेल्यांना शिक्षण देऊ इच्छिणाऱ्यांसाठी  अभ्यासक्रम चालविला जातो. 
  • चार वर्षांचा अभ्यासक्रम चालवू इच्छिणाऱ्या संस्था अर्ज करू शकतील, असे आरसीआयने म्हटले आहे.

Web Title: Two years B.Ed. for teachers Closed forever as 4 years course now from 2024-25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक