उद्योग क्षेत्रात वाढले फसवणुकीचे प्रकार! ८९ टक्के कंपन्यांचा अनुभव : सायबर सुरक्षा ही चिंतेची बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 01:39 AM2018-01-26T01:39:37+5:302018-01-26T04:22:17+5:30

भारतात उद्योग क्षेत्राशी संबंधित फसवणुकीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या १२ महिन्यांच्या काळात आम्हाला किमान एका फसवणुकीच्या घटनेचा बळी व्हावे लागले, असे देशातील ८९ टक्के कंपन्यांच्या कार्यकारी अधिका-यांनी सांगितले आहे. सन २0१६मध्ये घोटाळ्याची कबुली देणा-या कार्यकारी अधिका-यांचे प्रमाण ६८ टक्के होते.

 Types of cheating in industry sector! Experience of 89% Companies: Cyber ​​Security is a matter of concern | उद्योग क्षेत्रात वाढले फसवणुकीचे प्रकार! ८९ टक्के कंपन्यांचा अनुभव : सायबर सुरक्षा ही चिंतेची बाब

उद्योग क्षेत्रात वाढले फसवणुकीचे प्रकार! ८९ टक्के कंपन्यांचा अनुभव : सायबर सुरक्षा ही चिंतेची बाब

Next

नवी दिल्ली : भारतात उद्योग क्षेत्राशी संबंधित फसवणुकीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या १२ महिन्यांच्या काळात आम्हाला किमान एका फसवणुकीच्या घटनेचा बळी व्हावे लागले, असे देशातील ८९ टक्के कंपन्यांच्या कार्यकारी अधिका-यांनी सांगितले आहे. सन २0१६मध्ये घोटाळ्याची कबुली देणा-या कार्यकारी अधिका-यांचे प्रमाण ६८ टक्के होते.
‘क्रॉल अ‍ॅन्युअल ग्लोबल फ्रॉड अ‍ॅण्ड रिस्क’ या अहवालात ही माहिती देण्यात आली. यानुसार, भारतातील फसवणुकीच्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात आयपी चो-या, पायरसी व बनवेगिरी ३६ टक्के आणि भ्रष्टाचार व लाच याचे प्रमाण ३१ टक्के आहे. गेल्या १२ महिन्यांतील घटनांच्या विश्लेषणानुसार, ४५ टक्के उत्तरदात्यांनी त्यांच्या फसवणुकीला भागीदार जबाबदार असल्याचे सांगितले.
गेल्या वर्षी विद्यमान व माजी कर्मचारीच फसवणुकीतील प्रामुख्याने आरोपी होते. यंदा कनिष्ठ कर्मचारी अशा घटनांतील आरोपींमध्ये दुसºया स्थानी आहेत. ४३ टक्के प्रकरणात कनिष्ठ कर्मचारी आरोपी असल्याचे समोर आले आहे. फसवणूक व घोटाळ्यांचा फटका बसलेल्यांची संख्या २0१७ मध्ये २१ टक्क्यांनी वाढून ८९ टक्क्यांवर गेली आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण ८४ टक्के आहे. याचाच अर्थ भारतात फसवणुकीचे प्रमाण पाच टक्क्यांनी अधिक म्हणजे सर्वाधिक आहे, असे क्रॉलच्या दक्षिण आशियाच्या व्यवस्थापकीय संचालक रेशमी खुराणा यांनी सांगितले.
फसवणुकीमुळे आपल्या कंपनीला एकूण महसुलाच्या सात टक्क्यांपेक्षा जास्त फटका बसला, असे अनेक अधिकाºयांनी सांगितले. फसवणुकीमुळे एकूण महसुलाच्या सात टक्क्यांपेक्षा जास्त फटका बसलेल्या देशांत मेक्सिको अव्वलस्थानी आहे. तेथील ३९ टक्के अधिका-यांनी अशी तक्रार केली.
सायबर हल्ल्यामुळे बेजार-
सायबर सुरक्षा हा चिंतेचा मुद्दा आहे. गेल्या १२ महिन्यांत सायबर हल्ला झाल्याचे त्यांनी मान्य केले. २0१६मध्ये हे प्रमाण ७३ टक्के होते, ते २0१७ साली ६४ टक्के झाले आहे. याचाच अर्थ यंदा त्यात ११ टक्के वाढ झाली आहे. फसवणूक, सायबर व सुरक्षा जोखीम यात वाढ झाल्याचे उत्तरदात्यांनी मान्य केले.

Web Title:  Types of cheating in industry sector! Experience of 89% Companies: Cyber ​​Security is a matter of concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.