पर्सला ब्लेड मारताना रंगेहाथ पकडले फुले मार्केटमधील प्रकार : ६० हजारांचा ऐवज सुरक्षित

By admin | Published: November 19, 2015 09:57 PM2015-11-19T21:57:00+5:302015-11-19T21:57:00+5:30

जळगाव: फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या कोमल सुहास पाटील (रा.प्रोफेसर कॉलनी) यांच्या हातातील पर्सला ब्लेड मारुन पळण्याच्या तयारीत असताना तारबाई शंकर थाटशिंगारे (वय ३५) व शारदा सुनील कसब (वय २८) दोन्ही रा.देवपुर धुळे या दोघांना स्वाती करडे (रा.पुणे) यांनी गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, स्वाती कसब यांच्या समयसूचकतेमुळे २० हजार रुपयांची रोकड व ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र सुरक्षित राहिले.

Types of Flowers In Stock Market: 60 thousand pieces of money safe | पर्सला ब्लेड मारताना रंगेहाथ पकडले फुले मार्केटमधील प्रकार : ६० हजारांचा ऐवज सुरक्षित

पर्सला ब्लेड मारताना रंगेहाथ पकडले फुले मार्केटमधील प्रकार : ६० हजारांचा ऐवज सुरक्षित

Next
गाव: फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या कोमल सुहास पाटील (रा.प्रोफेसर कॉलनी) यांच्या हातातील पर्सला ब्लेड मारुन पळण्याच्या तयारीत असताना तारबाई शंकर थाटशिंगारे (वय ३५) व शारदा सुनील कसब (वय २८) दोन्ही रा.देवपुर धुळे या दोघांना स्वाती करडे (रा.पुणे) यांनी गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, स्वाती कसब यांच्या समयसूचकतेमुळे २० हजार रुपयांची रोकड व ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र सुरक्षित राहिले.
कोमल पाटील व स्वाती कसब या दोघं बहिणी गुरुवारी संध्याकाळी सराफ बाजारात सोने खरेदीसाठी गेल्या होत्या. तेथे खरेदी आटोपून शहर पोलीस स्टेशनच्या समोरच असलेल्या फुले मार्केटमध्ये महिलांचे कपडे विक्रीच्या बोळीत चालत असताना ताराबाई हिने कोमल यांच्या हातातील पर्सला शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येत असलेले ब्लेड मारले. हा प्रकार लागलीच स्वाती यांच्या लक्षात आला. त्यांनी ताराबाई व शारदा या दोघींना हटकले असता त्या पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडून पोलीस स्टेशनला आणले. दरम्यान, या प्रकाराबाबत तक्रार देण्यास नकार दिल्याने गुन्हा दाखल झाला नाही. परंतु दोन्ही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Types of Flowers In Stock Market: 60 thousand pieces of money safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.