Video - "फोन हिसकावला अन्...", उबर चालकाचं गैरवर्तन; महिलेने कॅबमधून मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 04:35 PM2023-10-05T16:35:55+5:302023-10-05T16:45:46+5:30

एका महिलेला उबर चालकाने त्रास दिल्यानंतर तिने अक्षरशः चालत्या कारमधून उडी मारल्याची भयंकर घटना घडली आहे.

uber driver misbehave with woman snatch her mobile then she jump out of the cab | Video - "फोन हिसकावला अन्...", उबर चालकाचं गैरवर्तन; महिलेने कॅबमधून मारली उडी

Video - "फोन हिसकावला अन्...", उबर चालकाचं गैरवर्तन; महिलेने कॅबमधून मारली उडी

googlenewsNext

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत, अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका महिलेला उबर चालकाने त्रास दिल्यानंतर तिने अक्षरशः चालत्या कारमधून उडी मारल्याची भयंकर घटना घडली आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. महिलेने आपबिती सांगितली आहे. @littlesssisters नावाने ओळखल्या जाणार्‍या मनाली गुप्ता या आपल्या मुलीला शाळेतून घेण्यासाठी जात असताना ही घटना घडली.

"मी माझ्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी उबर कॅबने जात होती. त्याच दरम्यान मी एका फोन कॉलमध्ये व्यस्त होते तेव्हा ड्रायव्हरने अचानक माझा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मला धक्का बसला, मी विरोध केला. त्यानंतर त्याने माझ्याशी गैरवर्तन देखील केलं. मी भीतीने त्याला ताबडतोब कार थांबवण्याची विनंती केली, परंतु त्याने माझ्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं आणि आणखी वेग वाढवला."

"हताश होऊन, मी सीटच्या दुसऱ्या टोकाला गेले आणि वाहन पुढे जात असताना बाहेर पडण्यात यशस्वी झाले. यानंतर चालकाने गाडीचा वेग वाढवला. मी Uber ला त्‍याच्‍या युजर्सची सुरक्षितता सुनिश्चित करण्‍यासाठी तत्काळ कारवाई करण्‍याची विनंती करते आणि श्‍याम सुंदर (2018 Eon, RJ14 TE 5679) नावाच्या या ड्रायव्‍हरवर बंदी घालण्यास सांगत आहे जेणेकरून भविष्‍यात अशा घटना घडू नयेत" असं मनाली यांनी इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. 

महिलेसोबत घडलेली ही घटना इन्स्‍टाग्राम आणि सोशल मीडियावर व्‍हायरल झाली. लोकांनी उबर चालकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सुरू केली. उबर इंडिया आम्हाला उत्तरं हवी आहेत. सुरक्षा कुठे आहे? महिलेची मुलगी तिच्यासोबत असती तर काय झालं असतं? असं का होत आहे याचे उत्तर हवं आहे असं देखील युजर्सनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: uber driver misbehave with woman snatch her mobile then she jump out of the cab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Uberउबर