उबेर बलात्कार प्रकरण : ड्रायव्हर शिव कुमार यादव दोषी
By Admin | Published: October 20, 2015 11:40 AM2015-10-20T11:40:27+5:302015-10-20T12:22:34+5:30
दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या उबेर कॅब बलात्कार प्रकरणी ड्रायव्हर शिव कुमार यादवला दोषी ठरवण्यात आले आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या उबेर कॅब बलात्कार प्रकरणी ड्रायव्हर शिव कुमार यादवला दोषी ठरवण्यात आले आहे. उबेर टॅक्सीचालक शिव कुमार यादवने गेल्या वर्षी एका तरूणीवर टॅक्सीतच बलात्कार केला होता, याप्रकरणी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने मंगळवारी यादवला दोषी ठरवले असून या प्रकरणी २३ ऑक्टोबर रोजी त्याला शिक्षा सुनावण्यात येईल.
गेल्या वर्षी ५ डिसेंबर २०१४ मध्ये रोजी पीडित तरूणीने इंदरलोक येथे आपल्या घरी जाण्यासाठी मोबाईल अॅपवरून उबेरकडून टॅक्सी मागवली होती. शिवकुमार यादव ही टॅक्सी चालवत होता. त्याने टॅक्सी एका निर्जन स्थळी नेऊन तरूणीवर बलात्कार केला आणि झाल्या प्रकराची वाच्यता न करण्याची धमकी देऊन तरूणीला घरी सोडले. मात्र त्या तरूणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी यादवला ७ डिसेंबर रोजी मथुरा येथून अटक केली. यावर्षी जानेवारी महिन्यात दिल्ली न्यायालयात शिवकुमार यादवविरुद्ध कलम ३६६ आणि ३२३ अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या संपूर्ण खटल्याच्या सुनावणीदरम्यान शिवकुमार यादवने अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता.