Udaipur Murder: उदयपूर हत्याकांड; कन्हैयालाल यांच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकरी, अशोक गहलोत यांची घोषणा

By ओमकार संकपाळ | Published: July 6, 2022 09:42 PM2022-07-06T21:42:46+5:302022-07-06T21:44:08+5:30

राजस्थानच्या जयपूरमध्येमध्ये कन्हैयालाल यांची दुकानात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली होती.

Udaipur Murder: Government jobs for both Kanhaiyalal's sons, CM Ashok Gehlot's announcement | Udaipur Murder: उदयपूर हत्याकांड; कन्हैयालाल यांच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकरी, अशोक गहलोत यांची घोषणा

Udaipur Murder: उदयपूर हत्याकांड; कन्हैयालाल यांच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकरी, अशोक गहलोत यांची घोषणा

Next

जयपूर:राजस्थानच्या जयपूरमध्येमध्ये काही दिवसांपूर्वी कन्हैयालाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मुलांच्या भविष्याबाबत राजस्थान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारने कन्हैयालाल तेली यांचे पुत्र यश आणि तरुण यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. नियुक्तीसाठी त्यांनी नियमात शिथिलता आणली आहे. ही नियुक्ती राजस्थान अधीनस्थ कार्यालय लिपिक सेवा (सुधारणा) नियम, 2008 आणि 2009 च्या नियम 6C अंतर्गत प्रदान केली जाईल.

शिंपी कन्हैयालाल यांची उदयपूर येथील त्यांच्या दुकानात हत्या करण्यात आली होती. यानंतर 30 जून रोजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत कुटुंबीयांना भेटायला आले होते. त्यावेळी राज्य सरकारकडून कुटुंबाला 51 लाखांचा धनादेशही देण्यात आला. यासोबतच दोन्ही मुलांना नोकरी देण्याचेही सांगण्यात आले.

गेहलोत यांचा भाजपवर निशाणा
सीएम गेहलोत म्हणाले की, कन्हैयालालच्या मारेकऱ्यांना आमच्या पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली होती. या भीषण घटनेबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली जावी म्हणून मी जोधपूरमधील माझा संपूर्ण कार्यक्रम सोडून जयपूरला परत आलो. पण या बैठकीऐवजी हैदराबादला त्यांच्या कार्यकारिणीच्या बैठकीला जाणे भाजपच्या नेत्यांनी योग्य मानले. आमच्या तपासात आम्ही आतापर्यंत कोणतीही कमतरता ठेवली नाही. असे असूनही ते लोकांना भडकावण्यात मग्न आहेत. भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत या दहशतवादी घटनेच्या निषेधार्थ निषेध प्रस्तावही मंजूर झाला नाही.

आरोपी पोलीस कोठडीत
कन्हैयालाल हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आणखी एका आरोपीला एनआयएने विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत एनआयएकडे पाठवले आहे. सूत्रांनी सांगितले की, वसीम अलीला मंगळवारी कट रचल्याप्रकरणी आणि कन्हैयाच्या दुकानाची रेकी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मद यांना घटनेच्या काही तासांनंतर अटक करण्यात आली होती.
 

Web Title: Udaipur Murder: Government jobs for both Kanhaiyalal's sons, CM Ashok Gehlot's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.