पुरस्कार परत घेण्यास उदय प्रकाश यांचा नकार
By admin | Published: January 25, 2016 01:51 AM2016-01-25T01:51:43+5:302016-01-25T01:51:43+5:30
हिंदी कवी उदय प्रकाश यांनी रविवारी साहित्य अकादमी पुरस्कार परत घेण्यास नकार दिला. ‘पुरस्कार वापसी’च्या मोहिमेत सहभागी लेखक आणि कलावंतांचे मन वळवत त्यांना
जयपूर : हिंदी कवी उदय प्रकाश यांनी रविवारी साहित्य अकादमी पुरस्कार परत घेण्यास नकार दिला. ‘पुरस्कार वापसी’च्या मोहिमेत सहभागी लेखक आणि कलावंतांचे मन वळवत त्यांना पुरस्कार परत करण्यासाठी रालोआ सरकारने चालविलेला खटाटोप केवळ स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, पुरस्कार परत घेण्यास नकार देणाऱ्या प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांनी रविवारी साहित्य अकादमीला पाठविलेल्या पत्रात असहिष्णुतेला विरोध कायम राहील असे बजावले आहे.
जयपूर साहित्य महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलताना उदय प्रकाश म्हणाले की, हैदराबादमध्ये दलित संशोधक विद्यार्थ्याचा मृत्यू होऊन केवळ एकच आठवडा उलटला असताना लेखक पुरस्कार परत स्वीकारत आहेत हे बघून मी व्यथित झालो आहे. असा निर्णय घेणे खूप घाईचे ठरेल असे मला वाटते.