उदयनराजे, राजीव सातव, प्रियांका चतुर्वेदी, फौजिया खान राज्यसभेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 04:33 AM2020-03-07T04:33:26+5:302020-03-07T04:33:48+5:30
ष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान व शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शनिवारी सुरुवात होईल. भाजपकडून उदयनराजे भोसले, काँग्रेसकडून राजीव सातव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान व शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्रातील सात राज्यसभा सदस्यांची मुदत पुढील महिन्यात संपत असून, त्या जागांसाठी २६ मार्चला मतदान होईल. बदललेल्या राजकीय समीकरणामुळे या निवडणुकांकडे साऱ्यांचे लक्ष आहे. महाराष्ट्राच्या २८८ जणांंच्या विधानसभेत भाजपचे १०५, शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ व काँग्रेसचे ४४ सदस्य आहेत. ही संख्या २५९ होते. या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मताला सर्वाधिक महत्त्व असल्याने पहिल्या पसंतीचे मत आपल्याला मिळावे, यासाठी राजकीय समीकरण निश्चित केले जात आहे.
>प्रियंका चतुर्वेदींना प्राधान्य
शिवसेनेतर्फे प्रियांका चतुर्वेदी व चंद्रकांत खैरे यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेस सोडून सेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना पसंती मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार निश्चित असून, दुसºया जागेसाठी माजी मंत्री फौजिया खान उमेदवार असतील, असे दिसते.