Uddhav Thackeray in Ayodhya: अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटी, उद्धव ठाकरेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 02:32 PM2020-03-07T14:32:54+5:302020-03-07T15:04:59+5:30

Uddhav Thackeray in Ayodhya: मी भाजपापासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही -उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray announces Rs 1 crore fund from Shiv Sena for the construction of Ram temple rkp | Uddhav Thackeray in Ayodhya: अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटी, उद्धव ठाकरेंची घोषणा

Uddhav Thackeray in Ayodhya: अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटी, उद्धव ठाकरेंची घोषणा

Next
ठळक मुद्देराम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांचा निधी 'शरयू नदीची आरती करण्याची इच्छा होती''भाजपा आणि हिंदुत्व या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही भाजपापासून बाजूला झालो आहोत'

अयोध्या : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. रामलल्लाचे दर्शन घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच, या ठिकाणी महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन निर्मितीचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.  

उद्धव ठाकरे म्हणाले, "गेल्या काही दिवसांत मी तीन वेळा अयोध्येत आलो आहे. शिवसेनेची मागणी होती सरकारने विशेष कायदा बनवून राममंदिर बांधावे, पण कायदा झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळाला. नोव्हेंबरमध्ये अयोध्येला आलो आणि नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री झालो. मी मुख्यमंत्री होईन असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. पण, तसे झाले. दीड वर्षात तीन वेळा अयोध्येत आलो आहे. मी येथे नियमित येणार आहे. शरयू नदीची आरती करण्याची इच्छा होती. मात्र, कोरोना व्हायरमुळे शरयू नदीची आरती करू शकत नाही. पण, यासाठी मी पुन्हा येईन." 


याचबरोबर, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. ते म्हणाले, "मी राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करतो. तसेच, उत्तर प्रदेशातील योगी सरकारने या ठिकाणी जागा दिल्यास महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन उभारण्याचा मानस आहे."


याशिवाय,  'भाजपा आणि हिंदुत्व या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही भाजपापासून बाजूला झालो आहोत, हिंदुत्वापासून नाही' असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, महाराष्ट्रातील सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालत आहे, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित आहेत. 
 

Web Title: Uddhav Thackeray announces Rs 1 crore fund from Shiv Sena for the construction of Ram temple rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.