तडजोड केली म्हणजे शेपूट घातले नाही- उद्धव ठाकरे
By admin | Published: January 23, 2015 11:06 PM2015-01-23T23:06:27+5:302015-01-23T23:06:27+5:30
मुंबई-माझा महाराष्ट्र अस्थिर होऊ नये याकरिता सत्तेत सहभागी होण्याची तडजोड स्वीकारली म्हणजे शिवसेनेने शेपूट घातलेली नाही. आम्ही सरकारजमा झालेलो नाही. राज्यातील हे भाजपाचे सरकार जनतेशी अन्यायाने वागत असेल तर त्या सरकारवर पहिला वार शिवसेनाच करील, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. देशातील भाजपा सरकारला संपूर्ण बहुमत असतानाही काश्मीरबाबतचे ३७० वे कलम रद्द का होत नाही आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी का केली जात नाही, असा सवाल करीत ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले.
Next
म ंबई-माझा महाराष्ट्र अस्थिर होऊ नये याकरिता सत्तेत सहभागी होण्याची तडजोड स्वीकारली म्हणजे शिवसेनेने शेपूट घातलेली नाही. आम्ही सरकारजमा झालेलो नाही. राज्यातील हे भाजपाचे सरकार जनतेशी अन्यायाने वागत असेल तर त्या सरकारवर पहिला वार शिवसेनाच करील, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. देशातील भाजपा सरकारला संपूर्ण बहुमत असतानाही काश्मीरबाबतचे ३७० वे कलम रद्द का होत नाही आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी का केली जात नाही, असा सवाल करीत ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले.शिवसेनाप्रमुख यांच्या जयंतीनिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. त्यानंतर दादर शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकापाशी बसवलेल्या प्रेरणा ज्योतीचे प्रज्वलन ठाकरे यांनी केले. ठाकरे म्हणाले की, आता आपण कुणाच्या मेहरबानीवर नाही. कुठल्याही लाटेवर तरंगणारे ओंडके नाही. हिंदूंना दहा बालकांना जन्म देण्याचा उपदेश करणार्या भाजपा नेत्यांना या मुलांना पोसणार कोण, असा सवाल करून ते म्हणाले की, केवळ मते टाकायला मेंढरांची पैदास नको. दुनिया हलवणारा एकच मुलगा पुरेसा आहे. घरवापसीचे आंदोलन करणार्या संघ परिवाराच्या नेत्यांना ठाकरे यांनी खडे बोल सुनावले. काश्मीरमधील पंडितांची घरवापसी का झाली नाही? वाजपेयी सरकारची परिस्थिती वेगळी होती. मात्र आता बहुमताचे सरकार असताना ३७०वे कलम, समान नागरी कायदा याबाबत भूमिका का घेतली जात नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न का दिले नाही, असा सवाल त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी).......................................बाळासाहेबांच्या स्मारकाकरिता उंबरठे झिजवणार नाहीशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक म्हणजे त्यांचा केवळ पुतळा नव्हे. माझ्या कल्पनेतील स्मारक उभे करण्याकरिता मी कुणाचे उंबरठे झिजवणार नाही किंवा वाडगा घेऊन फिरणार नाही. दिमाखाने व शानदारपणे स्मारक उभे राहणार असेल तर होऊ द्या, असे उदगार ठाकरे यांनी काढले............................................संजय दत्तचे फर्लो की फिरलो आणि परत गेलोएकेकाळी शिवसेनाप्रमुखांनी अभिनेता संजय दत्तची पाठराखण केली होती. त्याच दत्तला भाजपा सत्तेत मिळत असलेला हा फर्लो आहे की फिरलो आणि परत आत गेलो आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली. देशद्रोहाचा खटला असलेला आत-बाहेर कसा, असे ते म्हणाले.