मनपा व पालिकांच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढणार उद्धव ठाकरे : गुलाबरावांच्या मंत्रीपदाबाबत बोलणे टाळले
By admin | Published: December 20, 2015 11:56 PM2015-12-20T23:56:26+5:302015-12-20T23:56:26+5:30
सेंट्रल डेस्कसाठी (पत्रकार परिषदेची बातमी)
Next
स ंट्रल डेस्कसाठी (पत्रकार परिषदेची बातमी)जळगाव : आगामी काळात नगरपालिका व महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका आघाडी करुन नव्हे तर पक्षाच्या चिन्हावरच लढविण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावात झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले. आमदार गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद मिळेल का याबाबत मात्र त्यांनी बोलणे टाळले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेला संवाद प्रश्नोत्तर स्वरूपात असा...प्रश्न : शिवसेनेच्या दुष्काळी भागातील दौर्याकडे राजकीय दौरा म्हणून पाहिले जात आहे. त्याबाबत आपण काय सांगणार?उद्धव ठाकरे : शासकीय योजना शेतकर्यांपर्यंत पोहचत आहे किंवा नाही. तसेच शेतकर्यांना मदत मिळावी यासाठी आपला दौरा आहे. यापूर्वी मराठवाडा, विदर्भाचा दौरा केला. आता उत्तर महाराष्ट्राच्या दौर्यावरआलोआहे. दौर्याकडे कोण कसे पाहतो हा ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनाचा भाग आहे.प्रश्न : शिवसेना सत्तेत राहून स्वतंत्र फळी उभारण्याचा प्रयत्न करीत आहे का?उद्धव ठाकरे : आम्ही शेतकर्यांचे अश्रू पुसण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत. सध्या तरी आमची विरोधात राहण्याची भूमिका नाही. शिवसेना यंत्रणा म्हणून काम करून शेतकरी हितांसाठी लढणार आहोत.प्रश्न : पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी हे गुजरातमध्ये वळविले जात आहे. त्यावर सेनेची भूमिका काय?उद्धव ठाकरे : राज्यातील जे महत्त्वाची कामे आहेत. त्याची चार टप्प्यात वर्गवारी केली आहे.कामाचे स्वरुप आणि त्याला लागणारा वेळ याचा अभ्यास करून प्रश्न सोडविणार आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी हे उत्तर महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी आहे ते त्यांना मिळालेच पाहिजे.इन्फो-प्रश्न : आगामी काळातील मनपा व नगरपालिकांच्यानिवडणुका पक्षाच्या चिन्हावर की आघाडी करून लढणार?उद्धव ठाकरे : सर्व निवडणुका आघाडीकरुननव्हेतरपक्षाच्या चिन्हावर लढविल्या जातील.