उधमपूर हल्ला; आणखी एक अटक
By Admin | Published: October 14, 2015 11:41 PM2015-10-14T23:41:52+5:302015-10-14T23:41:52+5:30
गत आॅगस्टमधील उधमपूर हल्लाप्रकरणी आणखी एकास अटक करण्यात राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) यश आले आहे. अटकेतील व्यक्तीचे नाव सबजार अहमद आहे
श्रीनगर : गत आॅगस्टमधील उधमपूर हल्लाप्रकरणी आणखी एकास अटक करण्यात राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) यश आले आहे. अटकेतील व्यक्तीचे नाव सबजार अहमद आहे
उधमपूर अतिरेकी हल्ला घडविण्यासाठी पाकिस्तानी अतिरेकी नावेद कथितरीत्या एका ट्रकने उधमपूरपर्यंत आला होता. सबजार हा या ट्रकचा सहमालक आहे. मंगळवारी रात्री दक्षिण काश्मीरच्या कुलगाममधून त्यास अटक करण्यात आली. सबजार हा लष्कर ए तयब्बाच्या अतिरेक्यांना काश्मिरात प्रवेश करण्यासाठी कथितरीत्या वाहने पुरवायचा.
एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नावेद हा अन्य एक अतिरेकी मोहम्मद नोमान ऊर्फ मोमीन याच्यासोबत गत ५ आॅगस्टला एका ट्रकने उधमपूरला आला होता. या दोघांनी मिळून भारतीय सीमा सुरक्षा जवानांच्या एका ताफ्यावर हल्ला केला होता. सबजार हा संबंधित ट्रकचा वाहक आणि सहमालक होता.
लष्कर ए तय्यबाचे चार अतिरेकी मोहम्मद नावेद याकूब, झरगाम ऊर्फ मोहम्मद भाई, अबु ओकासा आणि नोमान यांनी भारतात प्रवेश केला होता. (वृत्तसंस्था)