३५ विद्यापीठांतील ‘दूरस्थ’ शिक्षण रद्द, यूजीसीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 06:43 AM2018-08-13T06:43:37+5:302018-08-13T06:43:51+5:30

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ३५ विद्यापीठांच्या दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांची (डिस्टन्स लर्निंग) मान्यता रद्द केली. यूजीसीच्या या निर्णयाचा देशातील लाखो विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो.

UGC decision to cancel 'distance' education in 35 universities | ३५ विद्यापीठांतील ‘दूरस्थ’ शिक्षण रद्द, यूजीसीचा निर्णय

३५ विद्यापीठांतील ‘दूरस्थ’ शिक्षण रद्द, यूजीसीचा निर्णय

Next

नवी दिल्ली - विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ३५ विद्यापीठांच्या दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांची (डिस्टन्स लर्निंग) मान्यता रद्द केली. यूजीसीच्या या निर्णयाचा देशातील लाखो विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो.
या विद्यापीठांना स्पष्टीकरण देण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. यूजीसीच्या डिस्टन्स एज्युकेशन ब्युरोने याबाबत सूचना जारी करीत स्पष्ट केले आहे की, या शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रम बंद करण्याबाबत विचार केला जात आहे. कारण, या अभ्यासक्रमांचे संचलन गत पाच वर्षांपासून होत नाही. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर होणार आहे. कारण, मुंबई विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट आॅफ डिस्टन्ट अ‍ॅण्ड ओपन लर्निंग, शिवाजी विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महात्मा गांधी विद्यापीठातील दूरस्थ अभ्यासक्रम रद्द करण्यात आले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३८ अभ्यासक्रमांपैकी फक्त १७ अभ्यासक्रम कायम ठेवले आहेत."

विद्यापीठांना एक संधी मिळणार

ज्या विद्यापीठांच्या दुरस्थ अभ्यासक्रमांची मान्यता रद्द झाली आहे. त्यांना यासाठी एक संधी मिळणार आहे. यूजीसीने अशा विद्यापीठांना महिनाभरात म्हणणे सादर करण्यास सांगितले. स्पष्टीकरण यूजीसीला पटले नाही तर त्या अभ्यासक्रमांची मान्यता काढून घेतली जाईल.

Web Title: UGC decision to cancel 'distance' education in 35 universities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.