देशातील २४ विद्यापीठे बोगस; पाहा यूजीसीनं जाहीर केलेली संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 02:17 AM2020-10-08T02:17:33+5:302020-10-08T07:32:39+5:30
नागपूरमध्ये एकमेव बोगस विद्यापीठ
मुंबई : केंद्रीय अनुदान आयोगाने (यूजीसी) बुधवारी जाहीर केलेल्या बोगस विद्यापीठांच्या यादीत देशातील २४ विद्यापीठांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील सर्वाधिक आठ आणि देशाची राजधानी दिल्लीतील सात विद्यापीठांचा समावेश आहे. महाराष्ट्रात नागपूरमधील राजा अरेबिक युनिव्हर्सिटीचाही यात समावेश आहे.
२०१६ साली देशात २१हून अधिक मर्यादित असलेली देशातील बोगस विद्यापीठांची संख्या २०१८ मध्ये २४, २०१९ मध्ये २३, तर यंदा पुन्हा २४वर पोहोचली आहे. ही बोगस विद्यापीठे नऊ राज्यांतील आहेत. येथे प्रवेश न घेण्याचे आवाहन विद्यार्थी व पालकांना यूजीसीने केले असून विद्यापीठांची नावे यूजीसीच्या संकेतस्थळावर जाहीर केली.
ही विद्यापीठे आहेत बोगस
दिल्ली : कमर्शिअल युनिव्हर्सिटी, युनायटेड नेशन्स, व्होकेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर-सेन्ट्रिक ज्युरीडीकल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग, विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी, आध्यात्मिक विश्वविद्यालय
केरळ : सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी
पश्चिम बंगाल : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, इन्स्टिट्यूट आॅफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अॅण्ड रीसर्च
कर्नाटक : बडगानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी
महाराष्ट्र : राजा अरेबिक युनिव्हर्सिटी, नागपूर
उत्तर प्रदेश : वनार्सेया संस्कृत विश्वविद्यालय, महिला ग्राम विद्यापीठ, गांधी हिंदी विद्यापीठ, नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स युनिव्हर्सिटी, नेताजी सुभाषचंद्र बोस युनिव्हर्सिटी, उत्तर प्रदेश विश्वविद्यालय, महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विश्व विद्यालय, इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद
ओडिशा : नबभारत शिक्षा परिषद, नॉर्थ ओडिशा युनिव्हर्सिटी आॅफ अॅग्रिकल्चर अॅण्ड टेक्नॉलॉजी
पुदुच्चेरी : बोधी अकॅडेमी आॅफ हायर एज्युकेशन
आंध्र प्रदेश : ख्रिस्त न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी