९ वेळा MA, २ वेळा PhD... आता आठव्यांदा UGC NET; परीक्षा क्रॅक करण्याचा अनोखा रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 03:09 PM2024-10-18T15:09:56+5:302024-10-18T15:10:31+5:30
आठ वेळा MA, दोनदा पीएचडी आणि आता आठव्यांदा यूजीसी नेट क्रॅक करून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कानपूरचे डॉ. अमित कुमार निरंजन हे UGC NET परीक्षेत क्वालिफाय झाल्यानंतर पुन्हा चर्चेत आले आहेत. ९ वेळा MA, दोनदा पीएचडी आणि आता आठव्यांदा यूजीसी नेट क्रॅक करून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. अमित यांनी आतापर्यंत आठ वेगवेगळ्या विषयांत UGC NET (University Grants Commission NET) परीक्षा उत्तीर्ण करून रेकॉर्ड केला आहे.
अमित यांनी ९ विषयांत मास्टर डिग्री देखील मिळवली आहे. हे करणारे ते भारतातील एकमेव व्यक्ती असल्याचा दावा त्यांनी केला आहे. डॉ. अमित हे राष्ट्रीय शिक्षण तज्ञ आहेत. त्यांचे मित्र आणि कुटुंबीय त्यांना एक होतकरू आणि अभ्यासू विद्यार्थी मानतात. अनेकवेळा परीक्षांना सामोरं जाण्याच्या प्रश्नावर अमित म्हणतात की, माझा विश्वास आहे की, कोणताही विषय अवघड नसतो. तो विषय कसा समजून घ्यायचा हे फक्त माहीत असायला हवं.
अमित यांना अभ्यासाची अनोखी युक्ती यश मिळवण्यात मदत करते. या खास युक्त्या ते नेहमी आपल्या सेमिनारमधून विद्यार्थ्यांना शिकवतात, जेणेकरून विद्यार्थ्यांना सर्वात कठीण विषयही सहज समजू शकतो. डॉ. अमितसाठी, UGC NET सारख्या परीक्षांमध्ये वारंवार बसणं हे केवळ वैयक्तिक आव्हानच नाही, तर कठीण परिस्थिती ही मनाची स्थिती आहे असा सकारात्मक मेसेज देण्याचे साधन आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
डॉ. अमित हे प्रसिद्ध लेखक असून संशोधन कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. विविध क्षेत्रातील त्यांचे प्रयत्न त्यांना विस्तृत ज्ञान मिळविण्यास सक्षम करतात, ज्यामुळे त्यांना UGC NET सारख्या परीक्षांमध्ये यश मिळवण्यात मदत होते. अमित म्हणतात की, यूजीसी नेटमध्ये वारंवार उत्तीर्ण होऊन मला तरुणांना एक मेसेज द्यायचा आहे की, तुम्हाला परीक्षा किंवा मोठ्या अभ्यासक्रमाला घाबरण्याची गरज नाही. पॅटर्न आणि अभ्यासक्रम समजून घेऊन योग्य तयारी केली तर यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.