उज्जैनला केला पत्नी व लेकीचा विधी! इंजेक्शन देऊन दोघींना संपवले : हत्याकांडानंतर सहाव्या दिवशी सचिन परतला जळगावात
By admin | Published: May 11, 2016 10:15 PM2016-05-11T22:15:33+5:302016-05-11T22:15:33+5:30
जळगाव : पत्नी कविता व मुलगी रेणाक्षी जाधव यांना सचिनने इंजेक्शन देऊन संपवले. त्यानंतर उज्जैनला जाऊन त्याने दोघींचा पारंपरिक विधीदेखील केला, अशी धक्कादायक माहिती सचिनच्या अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे.
Next
ज गाव : पत्नी कविता व मुलगी रेणाक्षी जाधव यांना सचिनने इंजेक्शन देऊन संपवले. त्यानंतर उज्जैनला जाऊन त्याने दोघींचा पारंपरिक विधीदेखील केला, अशी धक्कादायक माहिती सचिनच्या अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे.पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत; सचिनने हत्याकांडाचा घटनाक्रम सांगितला. ५ मे रोजी मध्यरात्रीनंतर त्याने लेकीसह पत्नीची इंजेक्शन देऊन हत्या केली. त्यानंतर रात्रीच दुचाकीने अजिंठा चौफुली परिसरात गेला. दुचाकी तेथेच सोडून तो पुढे शिर्डीला निघून गेला. ६ ते १० मे २०१६ या कालावधित तो दिल्ली, ग्वाल्हेर, उज्जैन याठिकाणीही गेला. उज्जैनला आल्यावर कुंभमेळ्यातही फिरला होता. त्याच ठिकाणी त्याने पत्नी व लेकीचा विधीदेखील केला. या क्षणापर्यंत त्याला इकडे पोलिसांनी हत्याकांडाच्या गुन्ात त्याच्या कुटुंबीयांना अटक केल्याची कल्पनाही नव्हती. कुटुंबावरील प्रेमाने आणले ओढूनआपण केलेल्या कृत्यानंतर आई-वडील, भाऊ-वहिनी यांचे काय झाले असावे? या विचाराने त्याच्या मनात काहूर माजले होते. आई-वडिलांवर असलेले त्याचे प्रेम आणि आता आपले सगळे संपले आहे, या विचारातून त्याने पोलिसांना शरण जाण्याचा विचार केला. म्हणून तो १० रोजी रात्री पंजाब मेल एक्सप्रेसने जळगावला येण्यासाठी निघाला. बुधवारी सकाळी ७ वाजता तो जळगावात पोहोचला, अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे.स्वत:ला संपणार होता?सचिनने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आपल्या जाण्यानंतर पत्नी, मुलींचे काय होणार? या विचारातून त्याने त्यांनाही संपवण्याचे ठरवले. म्हणून पत्नी व मुलीला इंजेक्शन दिल्यानंतर स्वत:ही इंजेक्शन घेतले. परंतु इंजेक्शन घेतल्यावर अर्ध्या तासानंतर त्याला जाग आली, अशीही माहिती समोर येत आहे. परंतु त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.