Radio show caller abuses pm modi mother : बीबीसीच्या लाईव्ह शोमध्ये पंतप्रधान मोदींच्या आईला शिवीगाळ; नेटकरी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 06:11 PM2021-03-03T18:11:54+5:302021-03-03T18:17:30+5:30
Uk bbc radio show caller abuses pm modi mother : या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर तुफान व्हायरल होत आहे. मोठ्या संख्येने लोक या व्हिडीओवर कमेंट करून आपला राग व्यक्त करत आहे.
ब्रिटनमध्ये बीबीसी आशियाई नेटवर्कच्या बिग डिबेट रेडिओ शोदरम्यान एका वक्त्यानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आईला अपशब्द वापरले आहेत. ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ निर्माण झाली असून लोकांमधून संतप्त प्रतिकिया येत आहेत. ब्रिटनमध्ये राहत असलेले शिख आणि भारतीय यांच्यातील जातीय भेदभाव यावर वादविवादाचं (डिबेट) आयोजन करण्यात आलं होतं. काही वेळानंतर ही चर्चा भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे वळाली.
@BritIndianVoice@HCI_London
— Sunny Johal (@DatchetTrainMan) March 1, 2021
Did anyone hear the whole show ? pic.twitter.com/W1R1J8lndC
या कार्यक्रमादरम्यान एका वक्त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई हिराबेन मोदी यांच्याविरुद्ध अपमानास्पद शब्द वापरले. या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर तुफान व्हायरल होत आहे. मोठ्या संख्येने लोक या व्हिडीओवर कमेंट करून आपला राग व्यक्त करत आहे. अनेकांनी बीबीसीच्या रेडीओ शो चे निर्माते आणि संघटनेवर टिकेचा वर्षाव केला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, अशी संतापजनक टिप्पणी बीबीसीने ऑनएअर जाण्यापासून रोखायला हवं होतं. बापरे! नदीवर म्हशी धूवून परतताना; अचानक मागून आली मगर, काही कळायच्या आतचं घडलं असं....
किरन बलखिया म्हणाले की, 'बीबीसीनं या गोष्टीची माफी मागायला हवी. त्यांनी अशा लोकांना आपल्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याआधी विचार करायला हवा होता. अशा प्रकारची भाषा सन्मानित स्थानांसाठी तयार झालेली नाही.' तर नंदिनी यांनी म्हटले की, 'ही खूप गंभीर बाब असून कमेंटमध्ये याचे उत्तर द्यायलाच हवे.' काय सांगता? तोंडावर मिशा उगवल्यामुळे या तरूणीला पुरूष समजताहेत लोक; गर्दीत जाताच होतं असं काही.....