सिंगापूरसह भारतातही मिळेल यूकेची पदवी
By admin | Published: September 15, 2016 02:54 AM2016-09-15T02:54:09+5:302016-09-15T02:54:09+5:30
मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट आॅफ सिंगापूर (एमडीआयएस) आणि चेन्नई येथील व्हेल्स विद्यापीठाने एकत्र येऊन तीन नवे अभ्यासक्रम आणले असून
चेन्नई : मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट आॅफ सिंगापूर (एमडीआयएस) आणि चेन्नई येथील व्हेल्स विद्यापीठाने एकत्र येऊन तीन नवे अभ्यासक्रम आणले असून, त्याअंतर्गत सिंगापूर आणि भारतात इंग्लंडमधील संदरलँड विद्यापीठाची पदवी कमी खर्चात आणि कमी वेळेत मिळवता येणार आहे.
याशिवाय काही अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत आणि भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इंटर्नशीप करता येणार आहे. सध्या सिंगापूरच्या या संस्थेत ८२ देशांचे विद्यार्थी शिकत आहेत.
एमडीआयएस आणि व्हेल्स विद्यापीठाने आणलेले तीनही नवीन अभ्यासक्रम यंदाच्या प्रवेशासाठी खुले करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांसाठी एमडीआयएस व्हेल्सने शैक्षणिक कर्जाचीही व्यवस्था केली आहे, अशी माहिती एमडीआयएसचे महासचिव डॉ. आर. देवेंद्रन यांनी दिली.