उत्तर भारतात कोरोनाचा 'ब्रिटन व्हेरिएंट', तर महाराष्ट्र-कर्नाटक-गुजरातमध्ये 'डबल म्युटंट'चा हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 05:39 PM2021-05-06T17:39:32+5:302021-05-06T17:41:58+5:30

CoronaVirus News : गेल्या वर्षी डिसेंबरपासून 10 प्रमुख सरकारी प्रयोगशाळा आणि संस्था कोरोना व्हायरसच्या जीनोम सिक्वेन्सिंग करत आहेत, असेही सुजित सिंह म्हणाले.

uk variant dominates north india, double mutant in maharashtra, gujarat, karnataka | उत्तर भारतात कोरोनाचा 'ब्रिटन व्हेरिएंट', तर महाराष्ट्र-कर्नाटक-गुजरातमध्ये 'डबल म्युटंट'चा हाहाकार

उत्तर भारतात कोरोनाचा 'ब्रिटन व्हेरिएंट', तर महाराष्ट्र-कर्नाटक-गुजरातमध्ये 'डबल म्युटंट'चा हाहाकार

Next
ठळक मुद्देनॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एसीडीसी) चे संचालक सुजित सिंह यांनी ही माहिती दिली.

नवी दिल्ली : उत्तर भारतात सध्या सर्वाधिक बर्‍याच लोकांना कोरोना व्हायरसच्या ब्रिटन व्हेरिएंटची लागण झाली आहे. तर महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये 'डबल म्युटंट' प्रकारच्या व्हायरसने हाहाकार माजवला आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एसीडीसी) चे संचालक सुजित सिंह यांनी ही माहिती दिली. तसेच, सुजित सिंह यांनी असेही म्हटले आहे की, सार्स कोव्ह-2 व्हायरसचे बी 1.1.7 व्हेरिएंटमुळे (ब्रिटन प्रकार) देशातील संक्रमित होणाऱ्या लोकांचे प्रमाण गेल्या एका महिन्यात 50 टक्क्यांनी कमी झाले आहे. (uk variant dominates north india, double mutant in maharashtra, gujarat, karnataka)

सुजित सिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, पंजाब (482 नमुने), दिल्ली ((516 नमुने) यासह उत्तर भारतात व्हायरसचे ब्रिटन व्हेरिएंट मुख्यता लोकांना संक्रमित करत आहे. यानंतर त्याचा परिणाम तेलंगणा (192 नमुने), महाराष्ट्र (83 नमुने) आणि कर्नाटकात (82 नमुने) दिसून आला. गेल्या वर्षी डिसेंबरपासून 10 प्रमुख सरकारी प्रयोगशाळा आणि संस्था कोरोना व्हायरसच्या जीनोम सिक्वेन्सिंग करत आहेत, असेही सुजित सिंह म्हणाले.

(कोरोना रुग्णांना दिलासा, बजाज हेल्थकेअरकडून 'Favijaj' टॅबलेट लाँच )

आतापर्यंत 18,053 नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली आहे. सिक्वेन्सिंग संबंधी माहिती फेब्रुवारी महिन्यात दोनदा आणि मार्च-एप्रिलमध्ये चार वेळा राज्यांसोबत शेअर केली आहे. त्याचबरोबर, डबल म्यूटंट ज्याला बी.1.617 या नावानेही ओळखले जाते. याचा मुख्यत: महाराष्ट्र (721 नमुने), पश्चिम बंगाल (124 नमुने), दिल्ली (107 नमुने) आणि गुजरात (102 नमुने) वर परिणाम होत आहे, असे सुजित सिंह यांनी सांगितले.

याचबरोबर, दक्षिण आफ्रिकेच्या प्रकारच्या व्हायरसचा परिणाम प्रामुख्याने तेलंगणा आणि दिल्लीमध्ये दिसून आला. ज्याला बी.1.315 च्या नावाने ओळखले जाते. ब्राझिलियन प्रकार फक्त महाराष्ट्रात आढळला आणि त्याचे प्रमाण नगण्य आहे, असेही सुजित सिंह यांनी सांगितले.

(Paytm वर आता COVID Vaccine slotsची माहिती, मिळणार इंस्टंट अलर्ट)

11 जूनपर्यंत जवळपास 4 लाख 4 हजार मृत्यूची नोंद 
बंगळूरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एका टीमने गणितीय मॉडेलच्या मदतीने भविष्यवाणी केली आहे की, देशात रुग्णांचा संख्या जर अशीच वाढत राहीली तर 11 जूनपर्यंत जवळपास 4 लाख 4 हजार मृत्यूची नोंद केली जाईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही आठवड्यात ही स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. मृतांची संख्या ही सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट असू शकते असे रिसर्चमध्ये म्हटले आहे. तसेच, कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यास रुग्णांची आणि मृतांची संख्या ही आणखी वाढू शकते. कोरोनापुढे अमेरिकेसारखा प्रगत देशही हतबल झाला आहे. अमेरिकेतील रुग्णांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे.

Web Title: uk variant dominates north india, double mutant in maharashtra, gujarat, karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.