धक्कादायक! आसामच्या तिनसुकियामध्ये उल्फाच्या दहशतवाद्यांकडून  5 जणांची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 07:54 AM2018-11-02T07:54:55+5:302018-11-02T07:55:11+5:30

आसाममधल्या तिनसुकिया शहरात युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या दहशतवादी संघटनेनं पाच जणांची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे.

ulfa terrirost attack in asam tinsukia killed many | धक्कादायक! आसामच्या तिनसुकियामध्ये उल्फाच्या दहशतवाद्यांकडून  5 जणांची निर्घृण हत्या

धक्कादायक! आसामच्या तिनसुकियामध्ये उल्फाच्या दहशतवाद्यांकडून  5 जणांची निर्घृण हत्या

Next

दिसपूर- आसाममधल्या तिनसुकिया शहरात युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या दहशतवादी संघटनेनं पाच जणांची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. उल्फाच्या दहशतवाद्यांनी त्या पाच जणांचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला.

गुरुवारी संध्याकाळी पावणे आठ वाजताच्या दरम्यान उल्फाच्या दहशतवाद्यांनी सहा तरुणांचं अपहरण केलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांना ब्रह्मपुत्रा नदीच्या किना-यावर नेऊन गोळ्या घातल्या. या गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात जात असताना जीव गेला. एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



आसाम पोलीस खात्यातील एडीजीपी मुकेश अग्रवाल म्हणाले, या हल्ल्यामागे उल्फा या दहशतवादी संघटनेचा हात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आसाममध्ये तरुणांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. ज्यात श्यामलाल बिस्वास, अनंत बिस्वास, अभिनाश बिस्वास, सुबोध दास यांची हत्या झाली आहे. हे सगळं एनसीआरमुळेच तर झालं नाही ना, अशी शंकाही ममतांनी उपस्थित केली आहे. ममता म्हणाल्या, या लोकांच्या मृत्यूचं दुःख आहे. या हल्ल्यातील दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तत्पूर्वी आसामाच्या गुवाहाटीमध्येही 13 ऑक्टोबर रोजी एक स्फोट झाला होता. ज्यात 4 जण गंभीररीत्या जखमी होते. 




 

Web Title: ulfa terrirost attack in asam tinsukia killed many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.