उमर खालिद, अनिर्बान यांना जामीन मंजूर

By admin | Published: March 19, 2016 01:32 AM2016-03-19T01:32:04+5:302016-03-19T01:32:04+5:30

जेएनयूमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आलेल्या उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य या विद्यार्थ्यांना न्यायालयाने

Umar Khalid and Anirban have been granted bail | उमर खालिद, अनिर्बान यांना जामीन मंजूर

उमर खालिद, अनिर्बान यांना जामीन मंजूर

Next

नवी दिल्ली : जेएनयूमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आलेल्या उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य या विद्यार्थ्यांना न्यायालयाने शुक्रवारी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सहा महिन्यांसाठी जामीन मंजूर केला.
या काळात त्या दोघांना देश सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. उमर खालिद आणि अनिर्बान २३ फेब्रुवारी रोजी रात्री पोलिसांना शरण गेले होते.
दरम्यान, जेएनयू प्रशासनाने ज्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांनी त्याचे उत्तर न देण्याचे ठरवले आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यक्रमाबद्दल विद्यार्र्थ्यावर कारवाई करण्याचे कारण नाही, अशी भूमिका तेथील प्राध्यापकांनी घेतली आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Umar Khalid and Anirban have been granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.