उमर खालिद आणि अनिर्बन दिल्ली पोलिसांना शरण

By admin | Published: February 24, 2016 12:14 AM2016-02-24T00:14:38+5:302016-02-24T04:43:38+5:30

देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा आरोप असलेले जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील अनिर्बन आणि उमर खालिद दिल्ली पोलिसांना शरण झाले आहेत.

Umar Khalid and Anirban surrender to Delhi Police | उमर खालिद आणि अनिर्बन दिल्ली पोलिसांना शरण

उमर खालिद आणि अनिर्बन दिल्ली पोलिसांना शरण

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ -  जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) देशद्रोहाचा आरोप असलेले दोन विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य अखेर मंगळवारी रात्री दिल्ली पोलिसांना शरण आले आहेत. 
काल (दि.२३) दिल्ली उच्च न्यायालयाने उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांना पोलिसांपुढे शरण येण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रात्री उशिरा साडे अकराच्या सुमारास विद्यापीठातून इतर विद्यार्थ्यांसह विद्यापीठाच्या गाडीतून पोलिसांना शरण येण्यासाठी बाहेर पडले.  दिल्लीतील वसंत कुंज येथील पोलीस स्टेशनमध्ये शरण होण्यासाठी गेले. यावेळी त्यांना पोलीस विहार पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त ठेवला आहे. 

Web Title: Umar Khalid and Anirban surrender to Delhi Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.