उमर खालिदसह पाच आरोपी जेएनयूत परतले
By admin | Published: February 22, 2016 02:03 AM2016-02-22T02:03:01+5:302016-02-22T09:38:56+5:30
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देशाविरोधात घोषणाबाजी करणारा मुख्य आरोपी उमर खादिल याच्यासह पाच आरोपी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
Next
>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देशाविरोधी घोषणाबाजी केल्याचा आरोप असलेला उमर खालिदसह पाचही आरोपी जेएनयू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये परतले आहेत.
पाचही आरोपी परतल्याची माहिती मिळताच, दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र विद्यापीठात उपस्थित १०० ते १५० विद्यार्थ्यांनी पोलिसांना प्रवेश करण्यास मनाई करत जोरजोरात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे बराच वेळ पोलीस विद्यापीठाच्या गेटसमोर ठाण मांडून होते.
त्यानंतर पोलिसांनी परिस्थितीची दखल घेत विद्यापीठात जाण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी सकाळपर्यंत विद्यापीठ प्रशासनाच्या परवानगीची वाट पाहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. पोलिसांना विद्यापीठात प्रवेश करण्यापासून रोखणारे विद्यार्थी या पाचही आरोपींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत होते.
उमर खालिदसह अनंत प्रकाश नारायण, आशुतोष कुमार, रामा नागा, अनिर्बन भट्टाचार्य या पाच जणांवर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला असून गेल्या काही दिवसांपासून त्यांचा शोध दिल्ली पोलीस घेत आहेत. काल रात्रीच्या सुमारास जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या परिसरात हे तसेच या पाच आरोपींना सकाळपर्यंत सरेंडर करण्यास सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.