भारत-चीन चकमक : धोकेबाज ड्रॅगनच्या उलट्या बोंबा, संयुक्त राष्ट्रने व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 09:04 AM2020-06-17T09:04:06+5:302020-06-17T09:32:52+5:30
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी सैन्यात झालेल्या चर्चेवरून या चकमकीत त्यांचे 43 सैनिक गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर यापैकी अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.
वॉशिंग्टन : पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरही परिणाम झाला आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी भारत आणि चीन यांच्यात एलएसीवर झालेली हिंसक चकमक आणि आणि मृत्यूच्या वृत्तांनंतर चिंता व्यक्त केली आहे. तसेच दोन्ही देशांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. या घटनेत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. तर चीनचे 43 सैनिक गंभीररित्या जखमी झाल्याचे समजते.
'शांतता राखण्याचे आवाहन' -
संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे प्रवक्ता एरी कनेको यांनी पत्रकार परिषदेत, 'भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या चकमकीसंदर्भात आणि मृत्यूसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. आम्ही या दोन्ही देशांना शांतता बाळगण्याचे आवाहन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.' यापूर्वी भारतीय लष्कराने एका निवेदनात म्हटले होते, की 15 आणि 16 जूनदरम्यानच्या रात्री गलवान भागात दोन्हीकडच्या सैन्यात हिंसक झटापट झाली. यात 17 भारतीय सैनिक गंभीररित्या जखमी झाले. यानंतर त्यांचा मृत्यू झाला. यात 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. याभागातील तापमान शून्यापेक्षाही कमी आहे.
India China Face Off: भारतीय सैन्य घमेंडी; मोठ्या युद्धासाठी तयार; चीनची युद्धखोरीची भाषा
चीनचे 43 सैनिक गंभीर जखमी -
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी सैन्यात झालेल्या चर्चेवरून या चकमकीत त्यांचे 43 सैनिक गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर यापैकी अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, यासंदर्भात चीनने कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती दिलेली नाही.
भारताचे तीन जवान शहीद, चीनचे पाच सैनिक ठार; घाबरलेला चीन म्हणतो- एकतर्फी पाऊल उचलू नका
भारतात बैठका सुरू -
सीमेवरील परिस्थिती पाहता स्वतः परराष्ट्रमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली येथे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ विपिन रावत आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक केली. राजनाथ सिंहांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.
India China Dispute : गलवान खोऱ्यात चीननं पसरवलय जाळं; हळू-हळू अशी वाढवली ताकद
भारतीय सैनिकांनीच हल्ला केल्याचा चीनचा कांगावा -
भारतीय सैनिकांनी चिथावणी देऊन हल्ला केल्यामुळेच हे घडल्याचा कांगावा चीनने केला आहे. चीनचे प्रवक्त म्हणाले, वरिष्ठ पातळीवर बैठक होऊन सीमेवरील तणाव कमी करण्यावर सहमती झाली होती. मात्र १५ जून रोजी भारतीय सैन्याने बेकायदा कृत्यांसाठी दोन वेळा सीमेचे उल्लंघन केले.
CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण
चीनचा हा कांगावा अजिबात न पटणारा आहे. एकीकडे चीनमुळे जगभर कोरोनाचे महामारी पसरली असताना, आता त्यावरून जगाचे लक्ष उडावे, यासाठीच चीनने या कागाळ्या सुरू केल्या आहेत. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी भारतात होत असतानाच नेमके चीनने हे केले आहे.
जाणून घ्या, काय आहेत पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले 'आमने-सामने'