विनाअनुदानित सिलिंडर 21 रुपयांनी महागला
By admin | Published: June 1, 2016 04:25 PM2016-06-01T16:25:46+5:302016-06-01T16:37:17+5:30
विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरही 21 रुपयांनी महागला
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1- मोदी सरकारच्या काळात सामान्यांचे काही अच्छे दिन येताना दिसत नाहीत. तेल कंपन्यांनी विमान इंधन आणि जेट इंधनाच्या किमतीत 9.2 टक्क्यांएवढी वाढ केली. तर विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरही 21 रुपयांनी महागला. जागतिक बाजारात वाढलेल्या किमतीमुळे चौथ्या तिमाहीत घरगुती सिलिंडर आणि इंधनाची किंमत वाढल्याचं कारण तेल कंपन्यांनी आता पुढे केलं आहे.
दिल्लीत विमान इंधनाच्या किमतीतही प्रतिकिलोलिटर 3, 945.47 टक्के म्हणजेच 9.2 टक्के एवढी वाढ केली आहे. तर तेल कंपन्यांनी प्रतिकिलोलीटर 46,729.48 टक्क्यांची वाढ केल्याची तेल कंपन्यांनी घोषणा केली आहे. या आधीही इंधनामध्ये 1 मे रोजी 1.5 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. तर 1 एप्रिलमध्ये 3,371 रुपयांची वाढ म्हणजेच 8.7 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती. प्रत्येक एअरपोर्ट्सवर सेल्स टॅक्स आणि मूल्यवर्धित करामुळे विमानाच्या इंधनाचे दरात चढउतार पाहायला मिळणार आहे. विमानाच्या इंधनात वाढ झाल्यामुळे ऑपरेटिंग खर्चातही 40 टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर आर्थिक बोजा पडणार आहे. मात्र एअरलाइन्सकडून इंधनाच्या वाढलेल्या किमतीचा प्रवाशांच्या तिकिटांच्या किमतीवर परिमाण होणार आहे की नाही याबाबत अद्यापही एअरलाइन्सकडून माहिती देण्यात आलेली नाही. त्यातच तेल कंपन्यांनी विनाअनुदानित एलपीजी गॅसच्या किमतीही वाढवल्या आहेत.
अनुदानित सिलिंडरच्या कोट्यातील ग्राहकांनी 12 सिलिंडरहून अधिक सिलिंडर घेतल्यास त्यांना 21 रुपयेप्रमाणे अधिकचे पैसे देऊन घरगुती सिलिंडर घेता येणार आहे. दिल्लीत घरगुती विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 527.50 रुपये असून, आता विनाअनुदानित सिलिंडरच्या ग्राहकांना सिलिंडर घेण्यासाठी 548.50 रुपये मोजावे लागणार आहेत. 1 मेपासून प्रत्येक सिलिंडरमागे 18 रुपयांची वाढ केली गेली होती. दिल्लीमध्ये अनुदानित 14.2 केजीच्या सिलिंडरची किंमत 419.18 रुपये आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय किंमतीनुसार विमान इंधन आणि विनाअनुदानित पुरवठादार इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचे दर निश्चित करतात.