कर्नाटकात निर्माणाधीन इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 06:14 PM2019-03-19T18:14:50+5:302019-03-19T18:37:05+5:30

कर्नाटकमधील धारवाडमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली.

An under-construction building collapses in Kumareshwar Nagar, Dharwad, many feared trapped | कर्नाटकात निर्माणाधीन इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती

कर्नाटकात निर्माणाधीन इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती

कर्नाटक : कर्नाटकमधील धारवाडमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

धारवाड येथील कुमारेश्वर या ठिकाणी असलेली ही निर्माणाधीन इमारत कोसळली. यावेळी इमारतीमध्ये अनेक मजूर काम करत होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. याचबरोबर, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, 40 हून अधिक जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


दरम्यान, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. 


Web Title: An under-construction building collapses in Kumareshwar Nagar, Dharwad, many feared trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.