Mission Shakti: अंतराळात भारताचा 'स्ट्राइक'; तीन मिनिटांत पाडलं सॅटेलाइट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 12:40 PM2019-03-27T12:40:43+5:302019-03-27T13:04:28+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मोठी घोषणा केली आहे.

Under Mission Shakti, India successfully tests anti-satellite weapon: PM Modi | Mission Shakti: अंतराळात भारताचा 'स्ट्राइक'; तीन मिनिटांत पाडलं सॅटेलाइट

Mission Shakti: अंतराळात भारताचा 'स्ट्राइक'; तीन मिनिटांत पाडलं सॅटेलाइट

Next

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मोठी घोषणा केली आहे. भारतानं अवकाश संशोधन क्षेत्रात मोठं यश मिळवल्याचं मोदी म्हणाले आहेत. भारतानं मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडला आहे. अशा प्रकारे मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. काही वेळापूर्वीच आमच्या वैज्ञानिकांनी अंतरिक्षात 300 किमी दूर लो अर्थ ऑरबिट लाइव्ह सॅटेलाइटला पाडलं आहे. भारतानं अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासात स्वतःचं नाव कोरलं असून, देशासाठी हा गर्वाचा दिवस आहे, असंही मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करताना म्हणाले, अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारताचा प्रवेश झाला आहे. उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SAT ने लाईव्ह सॅटेलाइटचा वेध घेतल्यानं भारताला अवकाश संशोधन क्षेत्रात मोठं यश मिळालं आहे.


या मिशनमुळे भारताला नवी ताकद मिळाली आहे. अंतराळ क्षेत्रात भारताचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. 


आज 27 मार्च आहे. आजच्याच दिवशी भारतानं अभूतपूर्व यश मिळवलं आहे. भारतानं स्पेस पॉवरमध्ये स्वतःच्या नावाचा समावेश केला आहे. आतापर्यंत तीन देशांकडे ही शक्ती होती. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारतही अशी शक्ती मिळवणारा चौथा देश ठरला आहे. 
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे मोठं यश आहे. या अभूतपूर्व यशामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून, तंत्रज्ञानाच्या बाबतही भारत प्रगतिशील राहणार आहे. 
यावेळी मोदींनी या क्षेपणास्त्राची निर्मिती करणाऱ्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. भारतीय क्षेपणास्त्रानं (A-SAT) पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह पाडला. या मोहिमेला 'शक्ती' असं नाव देण्यात आलं होतं.


  

Web Title: Under Mission Shakti, India successfully tests anti-satellite weapon: PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.