सर्वसाधारण गैरसमज, समजून घ्या ‘कोरोना’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 01:38 AM2020-04-15T01:38:29+5:302020-04-15T01:39:14+5:30
कोरोना व्हायरस डासांमुळे पसरतो : हा व्हायरस शरीरात जाण्याचा मुख्य स्रोत हा बाधित व्यक्तीकडून व नाका-तोंडातून श्वसनमार्गात जाण्याचाच आहे. डेंग्यू,
कोरोना व्हायरस माशीमुळे पसरतो : अमिताभ बच्चन यांनी विष्ठेतून व माशीमुळे कोरोना व्हायरस पसरतो, असे विधान केले होते. विष्ठेत कोरोना व्हायरस आढळू शकतो; पण तो याद्वारे पसरू शकतो, हे अजून सिद्ध झालेले नाही; तसेच माशीमुळे हा व्हायरस पसरतो यालाही अद्याप तरी शास्त्रीय आधार नाही. माशी इतरत्र कुठे कोरोनाबाधित जागेवर बसेल व ती आपल्या त्वचेवर बसून त्यातून कोरोना होईल हे शक्य नाही. म्हणून कोरोना हा माशीमुळे पसरत नाही.
कोरोना व्हायरस डासांमुळे पसरतो : हा व्हायरस शरीरात जाण्याचा मुख्य स्रोत हा बाधित व्यक्तीकडून व नाका-तोंडातून श्वसनमार्गात जाण्याचाच आहे. डेंग्यू, मलेरियाप्रमाणे तो डासांच्या माध्यमातून पसरत नाही.
टाळ्या वाजवल्याने हातावरचा व्हायरस
नाहीसा होतो : टाळ्या वाजवल्यावर १ ते १० किलो हर्ड्झ इतकी कमी फ्रिक्वेन्सी निर्माण होते. विषाणू, बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी ३० किलो हर्ड्झपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी आवश्यक असते. म्हणून टाळ्या वाजवल्याने हातावरचा कोरोना नष्ट होणे शक्य नाही.
घरगुती उपायांनी संरक्षण मिळेल : कुठलेही घरगुती औषध, नाकात तेल टाकणे, गरम पाणी पिणे याने हा आजार टाळणे शक्य नाही.
उपवास केल्याने लागण होत नाही :
उपवास केल्याने उलट शरीराची प्रतिकारशक्ती कमी होईल. म्हणून या काळात कोणीही उपवास करू नये. चांगला आहार घ्यावा.
उष्ण हवामानामुळे संसर्ग होणार नाही :
५६ डिग्रीच्या पुढे पाणी उकळल्याने कोरोना व्हायरस नष्ट होतो; पण बाहेरचे तापमान जास्त आहे किंवा उष्ण हवामान आहे म्हणून तो नष्ट होईलच असे नाही.
प्रतिकारशक्ती चांगली असल्याने भारतीयांना लागण होणार नाही : परदेशात राहणाऱ्या भारतीयांना बाधा झाली आहे. भारतीय वेगळे आहेत व त्यांना लागण होणार नाही किंवा कमी प्रमाणात होईल, असे मानण्यास सध्या काही शास्त्रीय आधार नाही.
- डॉ. अमोल अन्नदाते,
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)