समजून घ्या ‘कोरोना’, मास्क घालताना 'या' चुका टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 05:52 AM2020-04-14T05:52:15+5:302020-04-14T05:52:39+5:30

मास्क काढत असताना परत मधल्या भागाला हात न लावता काढावा

Understand 'Corona' masks and avoid mistakes | समजून घ्या ‘कोरोना’, मास्क घालताना 'या' चुका टाळा

समजून घ्या ‘कोरोना’, मास्क घालताना 'या' चुका टाळा

Next

सध्या सर्वांना मास्क घालण्यास सांगितले आहे; पण अनेकांना मास्क कसा घालावा, हे अजून माहीत नाही. मास्क घालताना व काढताना दोरीला धरूनच वापरावा. मास्कच्या तोंड झाकण्याच्या भागावर हात लावून वापरू नये. मास्क घालताना तो नाकाच्या शेंड्याच्या वरपर्यंत म्हणजे नाक सुरू होते तिथे वरपर्यंत यायला हवा. खाली हनुवटी पूर्ण झाकली जाऊन खालचा भाग पूर्ण हनुवटीच्या मागे जायला हवा. कानाच्या मागे दोऱ्या लावताना किंवा बांधताना इतक्या घट्ट लावाव्या की, चेहºयावर दोन्ही बाजूला मास्क येईल तिथे फार मोकळी जागा सुटायला नको.

मास्क काढत असताना परत मधल्या भागाला हात न लावता काढावा. एकदा मास्क काढल्यावर, तो थोडा वेळ इतरत्र घरात ठेवला.. परत वापरला असे करू नये. घरात वापरलेला मास्क काढून ठेवल्यावर सगळ्यात मोठा धोका लहान मुलांनी त्याला हात लावण्याचा आहे.
- डॉ. अमोल अन्नदाते,
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

मास्क नाकाखाली म्हणजे नाकपुड्या उघड्या राहतील, असे लावू नका.

मास्क हनुवटीच्या वर ठेवू नका. मास्क लावल्यावर हनुवटी दिसता कामा नये.

मास्क लावताना सैल लावल्यामुळे दोन्ही बाजूंना मोकळा, हवेची ये-जा होऊ शकेल, असा लावू नका.

नाकाच्या शेंड्यावर ठेवू नका. शक्य तितका शेंड्याच्या वर म्हणजे नाक सुरू होते तिथपर्यंत घ्या.

मास्क थोडा वेळ नको आहे म्हणून खाली ओढून लटकू दिला आणि नंतर परत घातला, असे करू नका.

मास्क असा घाला.

Web Title: Understand 'Corona' masks and avoid mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.