कमी वजनाची मुले उपेक्षित वर्गातीलच, शहरी भागातील अभ्यासाअंती निष्कर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:40 AM2017-10-26T04:40:24+5:302017-10-26T04:40:33+5:30
नवी दिल्ली : शहरी भागात उंचीच्या तुलनेत कमी वजन असलेले मूल आढळले, तर ते उपेक्षित वर्गाचे असते, असा धक्कादायक निष्कर्ष नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ न्यूट्रीशनच्या अभ्यासाअंती निघाला आहे.
नवी दिल्ली : शहरी भागात उंचीच्या तुलनेत कमी वजन असलेले मूल आढळले, तर ते उपेक्षित वर्गाचे असते, असा धक्कादायक निष्कर्ष नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ न्यूट्रीशनच्या अभ्यासाअंती निघाला आहे. या संस्थेने गेल्या २६ सप्टेंबर रोजी हा अभ्यास जाहीर केला. त्यात म्हटले आहे की, अनुसूचित जाती-जमातीची पाच वर्षांच्या आतील ३२-३३ टक्के मुले कमी वजनाची आहेत. सर्वसामान्य लोकसंख्येत हेच प्रमाण २१ टक्के आहे. निरक्षर वडील असलेली पाच वर्षांच्या आतील ३६ टक्के मुले कमी वजनाची आढळली आहेत, तर महाविद्यालयीन शिक्षण झालेल्या वडिलांची १६ टक्के मुलेच कमी वजनाची होती. ५०.२ टक्के मुले व ४४.६ टक्के मुलींना स्वच्छतागृहच उपलब्ध नव्हते, तर घरांमध्ये राहणारी मुले व मुलींना स्वच्छतागृह उपलब्ध नसण्याचे प्रमाण अनुक्रमे २६ व २४ टक्के होते. बालमृत्युंपैकी ५० टक्के मृत्यूचे कारण हे कुपोषण आहे.
अगदी सुरुवातीच्या वर्षांत कुपोषण असले, तर त्याचे प्रदीर्घ काळ परिणाम त्या मुलांच्या स्नायू, ज्ञानेंद्रिय, आकलन शक्ती, समाज व भावनात्मक विकासावर होतात, असे इंडिया स्पेंडने जुलै, २०१७ मध्ये म्हटले. वयानुसार उंची ही सामान्यापेक्षाही खाली असते, अशी वाढ खुंटलेली मुले आयुष्यभर शिक्षण आणि कामांची संधी गमावतात, असे एंड आॅफ चाइल्डहूड रिपोर्ट, २०१७ नावाच्या जागतिक अभ्यासात म्हटले आहे. ही मुले आजारपण किंवा रोगाला बळी पडण्याचीही जास्त शक्यता असते. परिणामी, त्यांचा त्यात मृत्यूही होऊ शकतो. दहापैकी फक्त एका मुलाचे पुरेसे पोषण होते, असे त्यात म्हटले.
>असा निघाला निष्कर्ष
ते बहुतांश वेळा ते अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीचे असते किंवा त्याचे वडील निरक्षर असतात किंवा ते कुटुंब स्वच्छतागृह नसलेल्या घरातच राहात असते. म्हणजेच अनुसूचित जाती-जमातीत जन्मलेली, वडील निरक्षर असलेली आणि घरात स्वच्छतागृहासारखी प्राथमिक सोय नसलेली मुले बहुधा कुपोषितच असतात.