नेत्यांनी आवाज बुलंद केल्याने भाजपमध्ये अस्वस्थ शांतता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 05:51 AM2021-09-07T05:51:20+5:302021-09-07T05:51:50+5:30
हरीश गुप्ता नवी दिल्ली : आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याच्या मागणीसाठी उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि अन्य ...
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याच्या मागणीसाठी उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि अन्य भागांतील पक्षाचे नेते दबाव टाकत असल्याने भाजपमध्ये अस्वस्थ शांतता आहे. हे आवाज पूर्वी पक्षात चार भिंतींच्या आत होते. मात्र, हा आवाज आता लोकांमध्ये मार्ग शोधत आहे. केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील एक खासदार अशा दोन प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली जावी, असे मत व्यक्त केले आहे.
चार वेळा लोकसभेचे खासदार असलेले खासदार वरुण गांधी म्हणाले की, मुजफ्फरनगरमध्ये लाखो शेतकरी एकत्र झाले आहेत. ते आमच्या रक्तामासाच्या नात्याचे आहेत. संजीव बाल्यान यांनी सावध प्रतिक्रिया दिली. पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक भाजप नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे की, मुस्लिम, अहीर, जाट आणि गुर्जर (एमजेजीएआर) यांची घातक आघाडी पुन्हा होऊ शकते. स्व. चौधरी चरण सिंह यांनी ७० च्या दशकात अशी आघाडी बनविली होती.
आंदोलक शेतकऱ्यांवरून व्यक्त होऊ लागले नेते
n हरियाणातील भाजप सरकारमधील उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी जाहीरपणे आंदोलक शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. पंजाबमध्येही अशीच भावना आहे.
n या राज्यात भाजपने शिरोमणी अकाली दलासारखा महत्त्वाचा सहकारी गमावला आहे. राजस्थानात भाजपला मोठा धक्का बसला असून सात वर्षांनंतर पंचायत समिती निवडणुकीत केवळ ५५० जागा मिळाल्या आहेत. त्या तुलनेत काँग्रेसला ६७० जागा मिळाल्या आहेत. राजस्थानात वसुंधरा राजे समर्थक आणि विरोधक यांच्यात पक्ष विभागलेला आहे.
n पक्ष नेतृत्वाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना शेतकऱ्यांशी चर्चेसाठी मैदानात उतरविले होते. तर, सरकार शेतकऱ्यांबाबत नरम राहिले.