अरेरे! बेरोजगार तरुणाच्या खात्यात अचानक आले 18 लाख, सत्य समजताच हादरला, झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 02:58 PM2023-06-23T14:58:20+5:302023-06-23T14:59:04+5:30
तरुणाने थेट जवळच्या एटीएममध्ये जाऊन त्याचा बँक बॅलेन्स तपासला. तेव्हा एक-दोन नव्हे तर एकूण 18 लाख रुपये त्याच्या बँक खात्यात जमा झाले होते.
कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. राजस्थानच्या हनुमानगडमध्ये राहणारा एक तरुण मोबाईलचा वापर करत होता. याच दरम्यान, अचानक त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. मेसेज वाचून तो आनंदाने उड्या मारू. तरुणाने थेट जवळच्या एटीएममध्ये जाऊन त्याचा बँक बॅलेन्स तपासला. तेव्हा एक-दोन नव्हे तर एकूण 18 लाख रुपये त्याच्या बँक खात्यात जमा झाले होते. यानंतर तो तरूण पैसे खर्च करू लागले.
सुरुवातीला पैसे आल्य़ावर तरुणाचा विश्वास बसला नाही, पण त्याने लगेच जवळच्या एटीएममध्ये जाऊन बॅलेन्स तपासला. तरुणाने सर्व पैसे खर्च केले. यानंतर एक दिवस बँकेतून फोन करून तरुणाला बोलावण्यात आलं. चुकून तरुणाच्या खात्यात 18 लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे आढळून आले. हे प्रकरण वाढल्यावर बँक अधिकाऱ्यांनीही तरुणाची चौकशी सुरू केली. सोबतच या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी जोधपूर जिल्ह्यातील भुंगरा गावात सिलिंडरचा स्फोट झाला होता. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला होता. बाधितांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. हीच रक्कम पीडित कुटुंबीयांच्या खात्यात हस्तांतरित केली जाणार होती, परंतु बँकेच्या थोड्याशा चुकीमुळे ही रक्कम हनुमानगड जिल्ह्यातील टिब्बी पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या दिनेश नावाच्या व्यक्तीच्या खात्यात गेली. निधी हस्तांतरित करताना, खात्याचा एक नंबर चुकला. त्यामुळे एवढी मोठी घटना घडली.
दिनेशनेही कोणतीही माहिती बँकेला न देता हे पैसे खर्च करण्यास सुरुवात केली. दिनेशने काही रक्कम वडिलांच्या उपचारावर खर्च केली तर काही इतर वस्तूंवर खर्च केली. त्याने खात्यातून जवळपास सर्व पैसे काढल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकरण वाढल्यावर कुटुंबाने जोधपूर जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास सुरू केला असता हा प्रकार उघडकीस आला. जोधपूर जिल्हा प्रशासनाने दिनेशला जाब विचारला असता त्याने पैसे परत करेन असं सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.