1 मार्चपासून बेरोजगारांना मिळणार 'भत्ता', युवकांना तीन तर युवतींना साडेतीन हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 05:06 PM2019-01-31T17:06:15+5:302019-01-31T17:08:38+5:30
राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने 199 पैकी 100 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर 73 जागांवर भाजपाला विजय मिळाला.
जयपूर - विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी बेरोजगार भत्ता देण्याचं आश्वास जाहिरनाम्यात केलं होते. त्यानुसार, 1 मार्चपासून राज्यातील बरोजगार युवकांना बेरोजगार भत्ता मिळेल, अशी माहिती अशोक गेहलोत यांनी दिली. गुरुवारी राजस्थान विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन अशोक गेहलोत यांच्याहस्ते झाले, त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली. मुलांना तीन हजार तर मुलींना 3500 रुपये भत्ता मिळणार आहे.
राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने 199 पैकी 100 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर 73 जागांवर भाजपाला विजय मिळाला. राजस्थानमध्ये पुन्हा एकदा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती झाली आहे. भाजपाला पराभवाचा सामना पत्कारावा लागला असून काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. मात्र, सत्ता स्थापनेनंतर काँग्रसने धडाडीनं आपल्या कामाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिल्यानंतर आता बेरोजगार युवकांना रोजगार भत्ता देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितलं आहे. 1 मार्चपासून बेरोजगार युवकांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार असून युवकांना 3 हजार तर युवतींना साडे तीन हजार रुपये दरमहा भत्ता मिळणार आहे.