बेरोजगारी रे भावा... इंजिनिअर अन् एमबीए ग्रॅज्युएट करतायेत पार्कींग अटेंडंटचं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 11:16 AM2020-03-03T11:16:40+5:302020-03-03T11:41:15+5:30

नोकरभरती करणाऱ्या एजन्सीने जवळपास 50 इंजिनिअर आणि एबीएधारक तरुणांना येथील कामावर रुजू केले आहे.

Unemployment, Engineer and MBA graduate as a parking attendant in chennai MMG | बेरोजगारी रे भावा... इंजिनिअर अन् एमबीए ग्रॅज्युएट करतायेत पार्कींग अटेंडंटचं काम

बेरोजगारी रे भावा... इंजिनिअर अन् एमबीए ग्रॅज्युएट करतायेत पार्कींग अटेंडंटचं काम

Next

चेन्नई - इंजिनिअर पदवीधारक युवक चेन्नईतील एका कार पार्कींगमध्ये अटेंडेंट म्हणून काम करत आहे. एस. आदित्य असे या युवकाचे नाव असून ते चेन्नई कॉर्पोरेशनच्या स्मार्ट कार पार्किंगसाठी बनविण्यात आलेल्या अॅपसाठी काम करत आहेत. विशेष म्हणजे या कामासाठी केवळ दहावी पास पात्रतेची आवश्यकता आहे. मात्र, आदित्य यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात नोकरी न मिळाल्याने त्यांनी हे कार पार्कींग अटेंडंटं काम स्विकारलं आहे. 

चेन्नई कॉर्पोरेनसाठी नोकरभरती करणाऱ्या एजन्सीने जवळपास 50 इंजिनिअर आणि एबीएधारक तरुणांना येथील कामावर रुजू केले आहे. या नोकरीवर काम करणाऱ्याने आदित्यने व्यक्त करत, आम्ही कमी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची नोकरी हिसकावून घेतली असं नाही. दहावी पास विद्यार्थ्यांना हे तंत्रज्ञान शिकायला 4 ते 5 तास लागतात. मात्र, आम्ही केवळ 2 ते 3 मिनिटांत अवगत करतो, असे आदित्यने म्हटले. तर, एमबीएची पदवी धारण केलेल्या आणि 21 वर्षांचा अनुभव असलेल्या राजेश यांनीही येथे टीम लिडर म्हणून नोकरी सुरू केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या कंपनीत मिळणाऱ्या पगाराच्या 55 टक्के कमी पगारात राजेश यांनी इथे ज्वॉईन केले आहे. राजेश हे कुटुंबात कमावणारे एकटेच आहेत, त्यांना 6 वर्षांचा एक मुलगाही आहे. त्यामुळे, मला नोकरीची गरज असल्याने मी ही नोकरी करत असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे एमबीए आणि बीई करुन सध्या नोकऱ्या नाहीत, म्हणून 10 हजारांपेक्षाही कमी नोकरी मिळाली असती, तरी मी ती स्विकारली असती, असे राजेश यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटले आहे. .

बेरोजगारीचा सामना करणाऱ्या 1500 पेक्षा अधिक पदवीधारकांना या नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यातून कंपनीने केवळ 50 उमेदवारांना नोकरीवर घेतले आहे. या 50 जणांना कंपनीकडून ट्रेनिंग देण्यात आल्याचं एसएस टेक एंड तूर्क मीडिया सर्विसेजच्या व्यवस्थापकाने सांगितले. दरम्यान, गतवर्षी तामिळनाडू विधानसभेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या 14  जागांसाठी तब्बल 4,600 इंजिनिअर, एमबीए धारकांनी अर्ज केला होता.
 

Web Title: Unemployment, Engineer and MBA graduate as a parking attendant in chennai MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.