बेराेजगारी वाढली, खेड्यांमध्ये नाही काम; शहरांमधील परिस्थिती दिलासादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 08:35 AM2023-03-03T08:35:00+5:302023-03-03T08:35:12+5:30

ग्रामीण भागातील बेरोजगारी वाढली असली, तरी अजूनही शहरांतील बेरोजगारी अधिक आहे. 

Unemployment increased, no work in villages; The situation in the cities is comforting | बेराेजगारी वाढली, खेड्यांमध्ये नाही काम; शहरांमधील परिस्थिती दिलासादायक

बेराेजगारी वाढली, खेड्यांमध्ये नाही काम; शहरांमधील परिस्थिती दिलासादायक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : फेब्रुवारी २०२३ मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर वाढून ७.४५ टक्के झाला. जानेवारीत तो ७.१४ टक्के होता. शहरांतील बेरोजगारी ८.५५ टक्क्यांवरून घटून ७.९३ टक्के झाली आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर ६.४५ टक्क्यांवरून वाढून ७.२३ टक्के झाला आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारी वाढली असली, तरी अजूनही शहरांतील बेरोजगारी अधिक आहे. 

सरकारी नोकऱ्या झाल्या कमी
केंद्र आणि राज्य सरकारांच्या नोकऱ्यांत २०२२ मध्ये ८ टक्के घट झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या एनपीएस डेटानुसार, २०२२ मध्ये एनपीएसमध्ये ५,६५,५०० नवीन सदस्य दाखल झाले. २०२१ च्या तुलनेत हा आकडा ८ टक्के कमी आहे. 

गावांमध्ये महिला सुस्थितीत
गेल्यावर्षी ग्रामीण भागात महिलांची स्थिती अधिक चांगली असल्याचे आढळून आले. शहरांत महिलांचा बेरोजगारीचा दर २७.९ टक्के राहिला. ग्रामीण भागात हा दर अवघा ४.५ टक्के असल्याचे आढळून आले. 
 

Web Title: Unemployment increased, no work in villages; The situation in the cities is comforting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.