हर हर महादेव! ‘या’ अद्भूत शिव मंदिराचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश; PM मोदींच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 09:56 AM2021-07-26T09:56:02+5:302021-07-26T09:57:04+5:30

आनंदाची बाब म्हणजे युनेस्कोने देशातील एका प्राचीन महादेव शिवशंकरांच्या मंदिराचा वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत समावेश केला आहे.

unesco announced kakatiya rudreshwara ramappa temple at telangana as a world heritage | हर हर महादेव! ‘या’ अद्भूत शिव मंदिराचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश; PM मोदींच्या शुभेच्छा

हर हर महादेव! ‘या’ अद्भूत शिव मंदिराचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश; PM मोदींच्या शुभेच्छा

googlenewsNext

नवी दिल्ली: भारतीय संस्कृती, परंपरा या खूप प्राचीन असल्याचे पाहायला मिळते. देशभरात अनेकविध देवतांची हजारो मंदिरे असल्याचे पाहायला मिळते. आनंदाची बाब म्हणजे युनेस्कोने देशातील एका प्राचीन महादेव शिवशंकरांच्या मंदिराचा वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसांच्या यादीत समावेश केला आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदींनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. (unesco announced kakatiya rudreshwara ramappa temple at telangana as a world heritage)

वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या तेलंगणमधील काकतिया रुद्रेश्वर रामप्पा या शिव मंदिराची दखल युनेस्कोने घेतली असून, याचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश करण्यात आल्याची घोषणा रविवारी करण्यात आली. विशेष म्हणजे या मंदिराचे शिल्पकार रामप्पा यांच्या नावाने हे मंदिर ओळखले जाते. मान्यतांनुसार, काकतीय वंशाचे राजांनी या मंदिराची उभारणी १२ व्या शतकात केली होती, असे सांगितले जाते. तब्बल ८०० वर्षांनंतरही या मंदिराची वास्तु बहुतांश तशीच असल्याचे दिसून येते. 

याला म्हणतात रिटर्न! TATA ग्रुपच्या ‘या’ कंपनीची कमाल; गुंतवणूकदारांचे केले १ लाखाचे ८७ लाख

पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

रामप्पा मंदिर महान काकातीय राजवंशातील उत्कृष्ट शिल्पकलेचे दर्शन घडवते. आपण सर्वांनी या अद्भूत मंदिराला आवर्जुन भेट द्यावी आणि भव्यतेचा अनुभव घ्यावा, अशी विनंती करतो, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे. पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनीही यासंदर्भात ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. अतिशय गौरवास्पद बाब आहे. युनेस्कोने काकतिया रुद्रेश्वर रामप्पा मंदिराचा समावेश जागतिक वारसांच्या यादीत केला. तेलंगणमधील प्राचीन संस्कृतीच्या समृद्धीचे हे एक प्रमाणच आहे. तेलंगणवासीयांचे अभिनंदन करतो, असे उपराष्ट्रपती नायडू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, तेलंगणधील तत्कालीन काकतिया वंशाचे महाराज गणपती देव यांनी सन १२१३ मध्ये या शिवमंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली होती. मंदिराच्या शिल्पकलेचे काम पाहून ते अत्यंत खूश झाले आणि शिल्पकार रामप्पा यांचेच नाव या शिव मंदिराला दिले. रामप्पा यांना हे मंदिर पूर्ण करण्यासाठी ४० वर्षे लागली होती, असे सांगितले जाते. या मंदिरात महाभारत, रामायण यातील काही प्रसंग रेखाटण्यात आले असून, शिवरात्री आणि श्रावण महिन्यात भाविकांची अलोट गर्दी येथे होते, असे समजते. 
 

Web Title: unesco announced kakatiya rudreshwara ramappa temple at telangana as a world heritage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.