दुर्दैव! इस्रोच्या ४५ वर्षीय इंजिनिअरचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 08:15 PM2020-01-02T20:15:29+5:302020-01-02T20:16:42+5:30
इस्रोच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.
चेन्नई - भारतीय अवकाश संशोधन संस्था असलेल्या इस्रोत काम करणाऱ्या एका इंजिनिअरचा रस्ते अपघातातमृत्यू झाला. पुगझेंती (४५) असं या मृत इंजिनिअरचे नाव आहे. कांचीपुरम जिल्ह्यातील कविथंदलम गावचे ते स्थानिक होते. तिरुअनंतपूरम येथील इस्रोच्या केंद्रामध्ये ते नोकरी करत होते. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.
मंगळवारी दुपारी मोराई गाव येथील आऊटर रिंग रोडवर झालेल्या अपघातात पुगझेंती यांचा मृत्यू झाला. त्यांची दुचाकीने स्टेशनअरी पिकअप वाहनावर जाऊन जोरदार धडक दिली. या धडकेत पुगझेंती यांनी हेल्मेट घालूनही त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर पुगझेंती यांना स्थानिक नागरिकांनी नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. पिकअप व्हॅनचा चालक रघुविरोधात वाहतूक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गाडीमध्ये बिघाड झाल्यामुळे गाडी रस्त्याच्याकडेला उभी केली होती असे रघुने पोलिसांना सांगितले.