अज्ञात वाहनाने सायकलस्वार युवकास उडवले

By admin | Published: April 24, 2016 12:40 AM2016-04-24T00:40:20+5:302016-04-24T00:40:20+5:30

जळगाव : अज्ञात वाहनाने एका सायकलस्वार युवकास उडवल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास चित्रा चौकात घडली. युवकाची ओळख अस्पष्ट असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

An unidentified vehicle fired the cyclists | अज्ञात वाहनाने सायकलस्वार युवकास उडवले

अज्ञात वाहनाने सायकलस्वार युवकास उडवले

Next
गाव : अज्ञात वाहनाने एका सायकलस्वार युवकास उडवल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास चित्रा चौकात घडली. युवकाची ओळख अस्पष्ट असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, चित्रा चौकातील नवरंग चहा दुकानाजवळ एका १५ वर्षीय सायकलस्वार युवकास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यानंतर धडक देणारा वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी अवस्थेत सायकलस्वार युवक रस्त्यावर पडलेला होता. ही घटना समोर आल्यानंतर परिसरातील वसीम बागवान, इसाक बागवान, मोहसीन बागवान, नीलेश पवार, संजय परदेशी या तरुणांनी जखमी युवकास तत्काळ रिक्षाद्वारे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यास अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्याठिकाणी डॉ.समीर चौधरी, डॉ.सचिन अहिरे यांनी त्याच्यावर उपचार केले.
श्वसननलिकेला दुखापत
अपघातात युवकाच्या श्वसननलिकेला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तातडीने त्याच्या घशात नळी टाकून त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला. युवकाच्या अंगात लाल रंगाची शाळेची पॅँट आहे. तो शिवाजीनगर किंवा गेंदालाल मिल भागातील रहिवासी असावा, असा अंदाज आहे. युवकास दुचाकीने उडवल्याची चर्चा घटनास्थळी होती. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

Web Title: An unidentified vehicle fired the cyclists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.