युवकांना आकर्षित करण्यासाठी संघ बदलणार गणवेश ?
By admin | Published: November 4, 2015 12:59 PM2015-11-04T12:59:17+5:302015-11-04T13:05:34+5:30
देशातील अधिकाधिक युवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित करण्यासाठी संघाचा गणवेश बदलण्याच्या विचारात असून संघ स्वयंसेवकांची 'हाफ पॅन्ट’ यापुढे 'फूल पॅन्ट' बनणार येणार असल्याचे समजते.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - देशातील अधिकाधिक युवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित करण्यासाठी संघाचा गणवेश बदलण्याच्या विचारात असून संघ स्वयंसेवकांची 'हाफ पॅन्ट’ यापुढे 'फूल पॅन्ट' बनणार येणार असल्याचे समजते. या विषयावर रांची येथे गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीदरम्यान चर्चा झाली असून संघात नवा ड्रेसकोड आणण्याचा विचार सुरू आहे. त्या बैठकीत काही स्वयंसेवक नवे गणवेश परिधान करून उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. संघाच्या गणवेशात शेवटचा बदल २०१० साली करण्यात आला होता.
सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी या नव्या गणवेशाला अनुमती दर्शवत वेळेनुसार आपण बदलण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र बैठकीस उपस्थित असलेल्या काही जणांनी या बदलास विरोध दर्शवला आहे. दरम्यान पुढील वर्षी मार्च महिन्यात संघाच्या 'अखिल भारतीय प्रतिनिधी सभे'त या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत गणवेशाचे दोन पर्यात समोर ठेवण्यात आले. पांढरा व अन्य रंगाचा टी-शर्ट, काळी पॅन्ट, सध्याचीच काळी टोपी, कॅनव्हासचे पांढरे बूट व खाकी रंगाचे मोजे असा खाकी रंगाचे मोजे हा पहिला पर्याय आहे. तर पूर्ण बाह्यांचा पांढऱ्या रंगाचा शर्ट, खाकी, नेव्ही ब्ल्यू किंवा राखाडी रंगांची पॅन्ट, काळ्या रंगाचे चामड्याचे अथवा रेक्झिनचे बूट, खाकी मोजे, कॅनव्हास पट्टा आणि काळी टोपी असा दुसरा पर्याय आहे.