मुंबईत रेल्वे डब्यामध्ये उघडणार ‘कोचटेरिया’, कर्मचाऱ्यांना गार्ड व टिसीसारखा गणवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 01:47 AM2018-08-01T01:47:04+5:302018-08-01T01:47:18+5:30
पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी मुंबईसह केरळमधील कन्नूर व तामिळनाडूतील मुट्टापुल्लयम या स्थानकांवर रेल्वेच्या डब्यामध्ये कॅफेटेरिया सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्याला कोचटेरिया असे नाव देण्यात येणार आहे.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी मुंबईसह केरळमधील कन्नूर व तामिळनाडूतील मुट्टापुल्लयम या स्थानकांवर रेल्वेच्या डब्यामध्ये कॅफेटेरिया सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्याला कोचटेरिया असे नाव देण्यात येणार आहे. कोचटेरियात काम करणाºयांना रेल्वेगार्ड, तिकिट तपासनीसासारखा गणवेश देण्याचा विचार आहे.
नीलगिरी माऊंटन रेल्वेप्रमाणेच मुंबईतील एका रेल्वे गाडीमध्येही विस्टाडोम डबा जोडण्यात आला आहे. विस्टाडोम कोचचा आनंद घेण्यासाठी प्रवासी व पर्यटक यांच्याकरिता मुंबईदेखील महत्त्वाचे पर्यटनस्थळ ठरले आहे. कोचटेरियातील आसनेही पर्यटकांना आपण रेल्वे डब्यांत बसूनच खात आहोत, असे वाटावे अशी असतील. ही कोचटेरिया आयआरसीटीसी की खाजगी एजन्सी चालविणार याबद्दल अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.
टूर आॅपरेटरद्वारे बुकिंग
माथेरान किंवा नीलगिरी येथे वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे बुक करण्याची सुविधा कॉर्पोरेट व टुर आॅपरेटरनाही उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे.