प्रत्येक महामार्गावर लागेल एकसमान टोल, आपण केली अमेरिकेची बरोबरी -नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:00 IST2025-02-04T10:59:26+5:302025-02-04T11:00:00+5:30
जास्त टोल आकारणी आणि खराब रस्त्यांच्या तक्रारींमुळे राष्ट्रीय महामार्गांबाबत नागरिकांची नाराजी वाढत आहे या पीटीआयने विचारलेल्या प्रश्नावर गडकरींनी वरील उत्तर दिले.

प्रत्येक महामार्गावर लागेल एकसमान टोल, आपण केली अमेरिकेची बरोबरी -नितीन गडकरी
नवी दिल्ली : भारताच्या महामार्गांवरील पायाभूत सुविधा आता अमेरिकेच्या बरोबरीने आहेत. त्याचवेळी राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालय एकसमान टोल धोरणावर काम करत असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी सांगितले.
जास्त टोल आकारणी आणि खराब रस्त्यांच्या तक्रारींमुळे राष्ट्रीय महामार्गांबाबत नागरिकांची नाराजी वाढत आहे या पीटीआयने विचारलेल्या प्रश्नावर गडकरींनी वरील उत्तर दिले.
जुना विक्रम मोडणार
महामार्ग मंत्रालय २०२०-२१ च्या दररोज ३७ किमी महामार्ग बांधण्याचा पूर्वीचा विक्रम चालू आर्थिक वर्षात मागे टाकेल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.
६४,८०९.८६ कोटी रुपये भारतातील एकूण टोल संकलन २०२३-२४ मध्ये पोहोचले आहे. ३५ टक्क्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यात वाढ झाली आहे. त्यामुळे लोक नाराज आहेत.
२७,५०३ कोटी रुपये टोल संकलन २०१९-२० मध्ये होते. आता त्यात प्रत्येक वर्षी वाढ होत आहे.